नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील धनेगाव येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देवून महामार्गावरून गावाला जोडणारा मुख्य रस्ता, दुध डेरी चौकातील मंदीर यांना भेट देवून पाहणी केली व पाणी पुरवठा योजनेचा ही आढावा घेतला, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटु पाटील शिंदे यांच्यी उपस्थिती होती.
धनेगाव गावाजवळून जाणार्या महामार्गावर उड्डाणपूल तयार होत आहे,या उड्डाणपुलामुळे गावाला जाणारा मुख्य रस्ता बंद होत आहे, त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचे काम थांबवून गावाला जोडणारा रस्ता बंद करू नये, शिवाय दुधडेअरी चौकातील हनुमान मंदिर बांधून देण्यात यावे, मुजामपेठ व धनेगावला जोडण्यासाठी पर्यायी मार्ग द्यावा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा अशी मागणी माजी जि.प.सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा धिकारी यांच्या कडे केली होती.
निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी धनेगावला भेट दिली. महामार्गामुळे बंद होणार्या रस्त्याची पाहणी केली शिवाय गावातील पाणीपुरवठा योजने संदर्भातही आढावा घेतला. यावेळी ग्रा.प.सदस्य बोटलावार, ग्रामसेवक विठ्ठल सुर्यवंशी ,यांचा सह शेख मुखतर, कार्यालयीन कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती.