नांदेडमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिकांची उपस्थिती होती.

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यात पोलीस निरीक्षक माणिक बेंदरे, होमगार्ड कार्यालयाचे राम बाळकृष्ण पिंजरकर व अरुण तेजराव परिहार यांचा पदक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस विभागाकडून उत्कृष्ट तपास कार्य करण्यात आलेल्या पोलीस उप अधीक्षक सुशील नायक, श्वान शेरु, बालाजी अंबलवाड, गजानन पल्लेवाड, रमेश शंकरराव खाडे यांचा पदक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा कारागृह विभागातील महिला शिपाई श्रीमती अर्चना डाखोरे यांचा उल्लेखनिय कार्य केल्याबाबत प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

कौशल्य विभाग, रोजगार, उद्योजगता व नाविण्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टूंडट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात एमजीएम कॉलेज ऑफ कॅम्प्युटर सायन्स ॲड टेक्नालॉजीचे मनोज विजयकांत वसमतकर, रुतुज राजेश देवडवार, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टीट्युटचे साईनाथ नामदेव आरसुळे, रोहित सुनिल पाईकराव, श्रीनिवास माळवदकर, शेख फिरदोस बशिर, एमजीएम महाविद्यालयाचे वरद उमेश जिंतुरकर, यश संजय महाजन, शिवप्रसाद फार्मसी महाविद्यालयाच्या श्रीमती गीता माणिकप्रभू बिजलवाड यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नायगाव तालुक्यातील सीएससी, मिनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, कहाळा चे उद्योजक विजय विश्वांभर पांचाळ यांना प्रथम पुरस्कार स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छ आणि 15 हजार रुपयांचा धनादेश तर नांदेड तालुक्यातील समर्थ इंडस्ट्रीज, खुपसरवाडी येथील उद्योजक संतोष गंगाधरराव अमिलकंठवार यांना द्वितीय पुरसकार स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छ आणि 10 हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सगरोळी येथील सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. यात अश्व पथकाने केलेल्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.

यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप व परेड कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस बल, सशस्त्र सीमा बल, जलद पतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, उपविभाग नांदेड शहर पथक, पोलीस शहर वाहतुक पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी शाळा, स्काऊट पथक, एसपीसी प्लाटून मनपा हायस्कूल, केंद्रीय विद्यालय एसपीसी पथक, पोलीस बॅन्ड पथक, अश्व पथक, डॉग स्काड, मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, अग्नीशामक वाहन, 108 रुग्णवहिका, पोलीस विभागास प्राप्त नवीन वाहने बोलरो निओ यांचा पथसंचलनात सहभाग होता.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!