नायगाव, रामप्रसाद चन्नावार| भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार मतदार यादीची विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी मतदार यादीत आपले नावे समाविष्ट करून घ्यावे आणि दुरुस्ती करून घेण्यासाठी एक जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह संक्षिप्त टिपणीसाठी नायगाव तालुक्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्ष व पत्रकार परिषद यांच्या आयोजित बैठकीत मतदान नोंदणी अधिकारी सौ स्वाती दाभाडे यांनी आवाहन केले आहे.
नायगाव तहसील कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेत सौ स्वाती दाभाडे यांनी याबाबत सविस्तर दिलेली माहिती अशी की, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2024 रोजी होणार असल्याने भारत निवडणूक आयोगाचे पत्र दिनांक 29- 5 – 2013 मधील पत्रातील निर्देशान्वये राज्यात आगामी वर्षाच्या एक जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सर्वसाधारण चालू वर्षाच्या शेवटच्या तीमाहित करण्यात येतो, जेणेकरून आगामी वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येते, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या नियम 14 मधील तरतुदीनुसार चार अर्हता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, एक जुलै, १ ऑक्टोंबर उपलब्ध असून त्यामुळे आगामी वर्षाच्या एक जानेवारी या अर्हता दिनांकावर वार्षिक पूर्ण निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
त्याचबरोबर आगामी वर्षातील पुढील एक एप्रिल, एक जुलै, आणि एक आक्टोंबर या तीन टप्पा दिनांकावर आधारित आगाऊ अर्ज स्विकारण्यात येत आहेत, नायगाव मतदारसंघांमध्ये एकूण 349 मतदान केंद्र आहेत. त्यातील नायगाव तालुक्यातील 171 तर उमरी 90 आणि धर्माबाद तालुक्यात 87 केंद्र असून नायगाव तालुक्यातील 171 मतदान केंद्रावर आपल्या मताचा अधिकार गाजविण्यासाठी मतदार नागरिकांनी आपले मतदान यादीतील नावे समाविष्ट करून व दुरुस्ती करून घ्यावे असे नायगाव तालुक्यातील नागरिकांना मतदान नोंदणी अधिकारी सौ स्वाती दाभाडे यांनी आवाहन केले असून यावेळी नायगावच्या तहसीलदार सौ .मंजुषा भगत व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.