नांदेड। नांदेड शहरातील पो. स्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांने धडाकेबाज कामगीरी केली असून, चोरी करनाऱ्या विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन वेगवेगळ्या कंपनीच्या 19 सायकली असा एकुण 1,47,000 रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक 03/04/2024 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्र 118/2024 कलम 379 भादंवि चा गुन्हा दाखल होता. श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार साहेब अपर पोलीस अधीक्षक नांदेड, किरतीका सी.एम. मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील सायकली चोरी करनाऱ्या चोरट्यांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस करने बाबत्त आदेशीत केले होते.
त्यानुसार श्री जालींदर तांदळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो. स्टे शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अमलदार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे गुन्ह्यातील विधीसंघर्षीत बालक यास दि. 04.04. 2024 रोजी ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील गेला माल favron कंपनीची सायकल व पोस्टे शिवाजीनगर हद्दीतुन तसेच नांदेड शहरातुन ईतर ठिकाणाहुन चोरलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 19 सायकली असा एकुण 1,47,000 रुपयेच्या सायकली हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केली. सदर कामगीरी बाबत वरिष्ठांनी पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी किरतीका सी.एम. मॅडम पोलीस निरीक्षक जालीदर तांदळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिर्लीद सोनकांबळे व पोहेकॉ रविशंकर बामणे, पोकों देवसिंग सिंगल, शेख अझरोदीन, दत्ता वडजे, राहुल लाठकर, लिंबाजी राठोड, अंकुश लंगोटे, यांनी पार पाडली.