नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील भूमिपुत्र असलेल्या रामकूमार ससाणे बोरगांवकर यांची तिसऱ्यांदा पदोन्नती होऊन दि. ०६ ऑकटोबर रोजी ते सहायक उप निरीक्षक पदावर जम्मू काश्मीर येथे रुजू झाले आहेत. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मौजे बोरगांव येथील भूमिपुत्र असलेल्या रामकूमार वाघोजीराव ससाणे बोरगांवकर यांनी स्वबळाबर केंद्रीय राखीव दलात सहभागी होण्याचे स्वप्न पहिले होते. त्यांच्या स्वप्नांना 1998 साली यश मिळाले. आणि ते केंद्रीय रिजर्व पुलिस बल मध्ये कांस्टेबल या पदावर सेवेत रूजू झाले होते. 2015 ला कांस्टेबल पदावरून हेड कांस्टेबल या पदावर पद्दोनती होवुन, सतत तिसऱ्यांदा पदोन्नति मिळून सहायक उप निरीक्षक पद मिळाले आहे. सध्या ते जम्मू कश्मीर श्रीनगर मध्य तैनात आहेत .
घरची परिस्थिति खूप नाजुक होती ना खायाला होत….. ना राह्याला घर होत…. अश्या परिस्थितीत शिक्षण घेवून त्यांनी फौजमध्य भरती होण्याचा निर्णय घेतला. आणि कोनाचाही सहारा नसताना लोकांच्या घरी राहून काम करून कष्ट करून स्वतः च्या जिद्दीने आणि आई बाबाचा आशीर्वादाने फौजमध्ये केंद्रीय रिजर्व पुलिस बल मध्य सेवेत रूजू झाले होते. आज सतत तिसऱ्यांदा पदोन्नति मिळून सहायक उप निरीक्षक पद मिळाले आहे. असं त्यांनी न्यूजफ्लॅश३६०डॉटईन शी बोलताना संगीतल.