नांदेड, अनिल मादसवार| गणेशोत्सव बंदोबस्त आणि विसर्जन शांततेत होऊन नांदेड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंडळाने भयमुक्त व डि.जे.मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांना केले आहे.

नांदेड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ठिक ठिकाणी शांतता कमिटीच्या बैठका घेवून नागरिकांसह प्रत्येक गणेश मंडळांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव बंदोबस्त शांततेत पार पाडावा यासाठी नांदेड जिल्हयातील महत्वाचे सर्व ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असुन, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. गणेशोत्सव बंदोबस्त कामी नांदेड शहर, ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच बाहेरून सुध्दा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अंमलदार यांना नेमण्यात आले आहे.

दि.06/09/2025 रोजी श्रीगणेश विसर्जन होणार आहे श्रीगणेश विसर्जन शांततेत पार पाडावे या अनुषंगाने अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात “पोलीस स्टेशन इतवारा- इतवारा बाजार सराफा बर्की चौक जुना मोंढा वजीराबाद कलामंदीर शिवाजी नगर आय टी आय चौक” या मार्गावर पथसंचलन घेण्यात आले.
सदर पथसंचलनामध्ये अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, परमेश्वर वेंजने, उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, प्रशांत शिंदे. उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, पोलीस निरीक्षक 08, सपोनि पोउपनि 14. पोलीस अंमलदार 150, होमगार्ड 100, आरसीपी प्लाटून 02, क्युआरटी प्लाटुन 01, वज्र वाहन व दोन थार वाहनांसह सहभागी झाले. अशाच प्रकारे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पथसंचलन घेण्यात येत आहे व एरीया डॉमीनेशन हालचाली चालु आहे.
