नांदेडमहाराष्ट्र

ग्रामसेवक युनियनच्या नांदेड तालुकाध्यक्ष पदासाठी मोठी आर्थिक उलाढाल ?

नांदेड| राज्यभरात मोठे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (रजी.नंबर डिएनई १३६) या संघटनेच्या रिक्त असलेल्या नांदेड तालुकाध्यक्ष पदासाठी कार्यरत जिल्हाध्यक्षांनी माजी जिल्हाध्यक्षासह अन्य संघटना पदाधिकाऱ्यांशी संगनमतातून आपली कुस बदलवित आर्थिक उलाढालीतून एकाची नियुक्ती निश्चित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आताफक्त केवळ निवडीची औपचारिकताच बाकी ठेवल्याने अनेकांतून नाराजीचा सूर आळविला जात असून, चक्क कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीच मुहूर्त असलेल्या दि.११ ऑक्टोंबर रोजीच्या बैठकीत यावर वादळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या नोंदणीकृत संघटनेचे नांदेड तालुकाध्यक्ष पद रिक्त असल्याने जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नांदेडमध्ये सदरच्या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. त्यातच जिल्हाध्यक्ष पदावर सेवानिवृत्तीपर्यंत असू द्या म्हणीत अकेला चलो रे चा कार्यक्रम आखून अनेक बाबींत स्वहित साधणाऱ्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांना हटवून कोलंबीत धनंजय वडजे यांना जिवाचे रान करित कांहींनी जिल्हाध्यक्ष म्हणून खुर्चिवर बसविले. परंतू पद प्राप्तीनंतर सद्या नांदेडमधील जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय ईमारतीत रोजच वावर असलेल्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाभरातील तालुका व जिल्हा कार्यकारिणीतील आपल्या बहुतांश सहकाऱ्यांना बाजूला सारुन या पदाची येरे माझ्या मागल्याची प्रचिती आणून दिलेली आहे.

त्यात भरिस भर म्हणून की काय ? त्यांनी माजी जिल्हाध्यक्षांसह अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जवळ केल्यानंतर आत्ता त्यांच्या मर्जीप्रमाणेच कामकाज सुरु ठेवलेले असून, त्याचीच प्रचिती त्यांनी रिक्त असलेल्या नांदेड तालुकाध्यक्ष पदासाठीही दिलेली आहे.मान्य पदे ६३ असलेल्या या तालुक्यात तब्बल ६२ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी व एक प्रतिनियुक्तीवर ग्रामसेवक कार्यरत असून, अर्धेअधिकजण या संघटनेचे सभासद आहेत. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येणारी जवळीकता व त्यातून आपल्या सभासद,सहकारी यांच्या विविध प्रश्नांच्या निवारणासह त्यांचे व स्वतःचे हित साधण्यासाठी सोबतच, स्वतःला एखादे आर्थिक सुबत्ता असलेली ग्रामपंचायत मिळविण्यासाठीही तालुकाध्यक्ष पदाचा पूरेपूर वापर होतो. त्यामूळेच या पदासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत हे हेरुनच संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षासह अन्य संघटनेचा पदाधिकारी असलेल्या तसेच, नांदेडच्या जिल्हा परिषदेत गत अनेक वर्षांपासून तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडे पिएगिरी करित पूनश्च प्रशासकीय ईमारतीतच ठाण मांडून बसलेल्या एका कर्मचाऱ्यांने जिल्हाध्यक्षांना याबाबत आपलेसे केले.

गत कांही बाबींत त्यांचे संगनमत असल्याने लगेच आपली कुस बदलून जिल्हाध्यक्षांनी त्यांचेच धोरण अवलंबून नांदेडच्या या महत्वपूर्ण पदासाठी अनेक नियम धाब्यावर बसविले. पेसा अंतर्गत असलेल्या माहूर व किनवट तालुक्यातीलच नव्हे तर, जिल्हाभरातील गांवपातळीवरचा कर्मचारी असलेली बहुतांश ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी वास्तव करुन नसतातच त्यांच्यावरच वरिष्ठांकडून कारवाई नसते. त्यामूळे मुख्यालय सोडण्याच्या परवानगीची गरजच नसल्याचे सांगून चक्क कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता थेट पंचायत समितीच्या सभागृहातच नांदेड तालुका कार्यकारिणी निवडीची बैठक बोलावली आहे. नियमबाह्यपणे निवडीच्या आदल्याच दिवशी सोशल मिडीयातून यासाठी सभासदांना अवगत करुन देण्यात आले. यावर विरोध असतांनाही त्यांनी बैठकीचा मुहूर्त कायम ठेवल्याने काहींनी माहिती घेतली असता सत्य उलगडले.

माजी जिल्हाध्यक्षासह अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीत आर्थिक उलाढालीतून सदरच्या पदासाठी एकाची नियुक्ती निश्चित करुन निवडीची औपचारिकताच उरली असल्याने सभासद संख्या कमी असली तरिही बैठकीत ठरल्याप्रमाणे निर्णय घेण्यात येतील त्यातून स्वहित साधले जाईल अशी जणू दूरदृष्टीच जिल्हाध्यक्षांनी ठेवल्याने याबाबतचा अनेकांतून विरोध होत असून, काहींनी थेट नाराजीचा सूर आळविलेला आहे. त्यामूळे होऊ घातलेल्या कार्यकारिणी निवडीच्या बैठकीत चांगलेच वादळ निर्माण होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

महत्वाचे म्हणजे विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यांपाठोपाठ महिला सक्षमीकरणासाठीही कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदावर जिल्हाभरात शेकडो महिला कर्मचारी आहेत. त्यातील अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सभासद, सदस्य आहेत मात्र तरिही जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या अध्यक्षपदावर महिला विराजमान नाहीत. त्यामूळेच किमान नांदेडमध्ये या पदावर महिलांना स्थान द्यावे असाही सूर आळविला जात असून, या तालुक्यात तब्बल १८ महिला ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे समजते.

तालुकाध्यक्षपदासाठी अनेकजण ईच्छूक असतांना थेट मतदानाऐवजी या पदावर एकाची आधीच ठरविलेल्या नियुक्तीची चर्चा व त्यातून कांहीचे साधलेले आर्थिक हित, आधी सभासद व सदस्य मतदार यादीची प्रसिद्धी नंतरच निवड प्रक्रिया, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीची बैठक, महिला सभासदांना महत्वपूर्ण पदावर प्रतिनिधीत्व यासह जून्या जानत्यांना विचारात न घेणे. यासाठी तालुकाध्यक्ष पदासाठीचे कांही ईच्छूक बैठकीत वादळ निर्माण करण्याची दाट शक्यता असून, त्यातच भरिस भर म्हणून जिल्हा कार्यकारिणीतील काही पदाधिकारी यांनी माजी जिल्हाध्यक्षासह अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सलगी करणार्‍या जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे यांच्या एकला चलो रे म्हणीत स्वहित साधण्याच्या प्रवृतीला लगाम घालण्यासाठी आजचा मुहूर्त ठरविला आहे.

या तालुक्यात दिनांक ५ ऑक्टोबर रोजीच्या स्वाक्षरीतील पत्र त्याच दिवशी सभासदांपर्यंत पोहचविणे अत्यावश्यक असतांना निवडीच्या आदल्या दिवशी त्यासाठी दिलेल्या प्रसिद्धीवर नाराजीचा सूर आळवित जिल्हाध्यक्ष हटाव, संघटना बचाव च्या कार्याला आजपासून सुरुवात करणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. एकंदरित ग्रामसेवक युनियनचा नांदेड तालुका कारभारी निवड चांगलीच चर्चेत आल्याने बैठक वादळी होते का ? होण्याआधीच रद्द करुन पूढे ढकलली जाते यावरही तर्कवितर्क लढविले जात असून याबाबत काही तासातच चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान चर्चेनुरुप माहितीनुसार अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे यांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनीवरील काॅल स्विकारला नाही.

 

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!