वीर जवान महेंद्र अंबुलगेकर यांना बळीरामपुर वासियांचा अखेरचा निरोप… रॅली काढून पुष्पवृष्टी करून अभिवादन
नवीन नांदेड। विर शहीद जवान महेंद्र अंबुलगेकर यांना बळीरागमपुर वासियांनी सकाळी ६ वाजता हैदराबाद ते नांदेड रुग्णवाहिका व्दारे आलेल्या पार्थिव देह ग्रामस्थांनी सश्रुनियांनी व परिसरातील रस्ते स्वच्छ करून रस्त्यावर रांगोळी, अनेक ठिकाणी फुलाच्या हारचा कमानी, प्रत्येक निवास स्थानावरून पुष्प वृष्टी करून महिला युवक, युवती, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांनी आंदरजली वाहली यावेळी भारत माता कि जय, अमर रहे या घोषणांनी परिसर गहिवरून गेला.
बळीरामपुर ता. जी नांदेड येथील विर जवान महेंद्र अंबुलगेकर यांना विर मरण आल्याचे माहिती मिळाल्या नंतर कुटुंब व मित्र परिवाराने निवासस्थान कडे धाव घेतली, पार्थिव देह कधी येणार या कडे सर्वाचे लक्ष लागले, अखेर ४ फेब्रुवारी रोजी अरूणाचल प्रदेश येथुन हैदराबाद येथे विमानाने रात्री दोन वाजता आल्या नंतर रुग्णवाहिका व्दारे नांदेड येथे सकाळी सहा वाजता आले, यावेळी अनेक गावातील नागरिक, युवक, समाज बांधव , महिला, मोठ्या संख्येने चंदासिगं कॉर्नर येथे जमा झाले, येथुन अभिवादन रॅली काढून बळीरामपुर येथे निवासस्थानी येत असतांना दुतर्फा सकाळी मोठया प्रमाणात बळीरामपुर वासियांनी फुलांची पुष्पवृष्टी करून अभिवादन केले.
निवासस्थानी ठेवण्यात आलेल्या पार्थिव देहावर पुष्पचक्र प्रथम नागरिक संरपच रेणुका पांचाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले,माजी सरपंच अमोल गोडबोले, किशन गव्हाणे, नागोराव अंबटवार, विशवाभंर फूले ,उपसरपंच ,पिंटु वाघमारे अशोक वाघमारे,रवि भंडारे, साहेबराव चिते, ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य ,आनंद गुंडले, मारोती कुद्रे, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते भाजपा नगरसेविका सौ.बेबीताई गुपीले, साहेबराव भुरे, माधव ऊमरजकर, विकास सुर्यवंशी,यांच्या सह विविध पक्षाचे, सामाजिक,शैक्षणिक, पत्रकार , पदाधिकारी, यानी अभिवादन केले, यावेळी अनेकांना गहिवरून आले, अमर रहे,भारत माता कि जय घोषणा देण्यात आल्या.
ग्रामीण पोलीस निरीक्षक आयलाने,उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस अमलंदार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला तर माजी जवान सैनिक संघटनेच्या जवानांनी यावेळी उपस्थितीती होती, सदरील पार्थिव देह निवासस्थाना पासून बळीरामपुर मार्ग माता रमाई चौक मार्ग सिडको येथे सर्व पक्षीय अभिवादन करून पुष्पवृष्टी केली, सिडको संभाजी चौक मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग हे पार्थिव देह सोनखेड मार्ग लोहा कंधार अंबुलगा रवाना झाला.