नांदेड। राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे दुसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच जवळा दे. ता. लोहा जि. नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या जनहित साहित्य संमेलनात हिंदी भाषेतील कसदार समीक्षात्मक लेखनाबद्दल हिंदी लेखक व समीक्षक प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांना ‘जनहित साहित्यरत्न पुरस्कार 2024’ नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी, लेखक, कादंबरीकार प्रा. महेश मोरे, उद्घाटक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मा. श्री दिगंबर ग. कदम, स्वागत अध्यक्ष जवळा दे. च्या सरपंच इंदुताई माधवराव पावडे, प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक मा. श्री देवदास फुलारी, स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. श्री प्राचार्य डॉ. अशोक पाटील गवते, निमंत्रक माजी सरपंच कमलताई साहेबराव शिखरे, संमेलन संयोजक आमचे मित्र मा. भैयासाहेब तुकाराम गोडबोले आदींची उपस्थिती लाभली होती.