Author: NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

हिमायतनगर | गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असताना शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रीभर कोसळत राहिला. शनिवारी सकाळी पळसपुर येथील नागनाथ मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. सुदैवाने मंदिराला कोणतीही हानी झाली नाही. तथापि, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. लहानमोठ्या नाल्यांना पूर येऊन वडगाव (ज), पळसपुर, सिरपलीसह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. शहरात नाल्याचे पाणी घरांमध्ये आणि बाजारातील दुकानांमध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीचे प्रचंड नुकसान नदी-नाल्यांचा पूर शेती बांध फोडून शेतात घुसला, परिणामी शेतकऱ्यांची बहरलेली कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिके उद्ध्वस्त झाली. पावसामुळे उभे…

Read More

नांदेड| भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांच्या ध्वजारोहणाचे कार्यक्रम सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने…

Read More

हिमायतनगर│हर घर तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने हिमायतनगर नगरपंचायतच्या वतीने मंगळवारी उमरखेड रोड वरद विनायक मंदिर परिसरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहर व परिसरातील शाळा–महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, तिरंग्याबद्दलची जाणीव आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा याविषयी मार्गदर्शन केले. नगरपंचायतीचे अधिकारी, शिक्षकवर्ग आणि नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच दिनांक १४ ऑगस्ट रोजी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच भाजप पक्षाच्या सहभागातून दिनांक 14 ऑगस्ट (गुरुवार) रोजी श्री परमेश्वर मंगल कार्यालय मैदानातून भव्य तिरंगा रॅली…

Read More

हिमायतनगर,अनिल मादसवार| विदर्भ–मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पास मंजुरी देण्याच्या मागणीविरोधात चाळीस गावांतील हजारो शेतकरी शनिवारी सिरपल्ली येथे एकवटले. “जान देंगे, जमीन नहीं देंगे” (We will give our lives, but not land) या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 1962-65 च्या काळात सुपीक जमिनीमुळे स्थगित झालेला हा प्रकल्प 2011 ला पुनर्जिवीत झाला होता, मात्र जनसुनावणींनंतर पुन्हा स्थगित झाला. जुलै 2025 मध्ये हदगाव-उमरखेडच्या आमदारांनी विधान भवनात मंजुरीची मागणी करताच हा विषय पुन्हा पेटला असून, प्रकल्प सर्वेसाठी 700 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरपल्ली येथे संपन्न झालेल्या सभेत शेतकरी नेत्यांनी सवाल केला असून, “शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर बंधारे बांधा;…

Read More

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरानजीक असलेल्या रामबाबू महाराज आदिवासी ग्रामीण विकास मंडळ वाळकेवाडीद्वारा संचलित मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळा ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुदान तत्वावर चालविली जाते. या शाळेचे संस्था चालक माधवराव वैद्य हे विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त असून, त्यांनी यापूर्वी या पदावर काम केलेले व विभागातील अनेक विद्यमान कार्यरत अधिकारी यापूर्वी वैद्य यांच्या अधिनस्त काम केलेले असल्याने शाळेतील बेकायदेशीर, नियमबाह्य कामाची पाठराखन करीत आहेत. आधीचे प्रभारी मुख्याध्यापक व सहशिक्षक गणपत दुधाडे यांचे अनेक महिण्याचे वेतन रोखले आहे. तक्रार केली असता, वरिष्ठ दखल घेण्यास तयार नाहीत. अशी तक्रार शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही लाखो भाविक श्री दत्तात्रेय संस्थान शिखर देवस्थान परिसरात पायी परिक्रमा यात्रेसाठी येणार आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेत मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक गणेश कराड, नायब तहसीलदार कैलास जेठे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संपूर्ण परिक्रमा मार्गाची पाहणी केली. यात्रेदरम्यान श्री दत्तात्रेय संस्थान, शिखर देवस्थान, तसेच जंगल परिसरातील इतर देवस्थानांवर लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यांच्यासाठी पोलीस, नगरपंचायत, वनविभाग, देवस्थान समिती व…

Read More

हिमायतनगर| बुधवारी शहरातील आठवडी बाजार च्या गर्दीची संधी साधून चोरट्यांनी अनेक बाजार करणाऱ्यांना नागरीकांच्या खिशातील मोबाईल वर डल्ला मारत आयफोन सारखे जवळपास दिड लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरीला गेले असल्याने बाजार करू घाबरले असुन जवळपास दहा ते पंधरा लोकांचे मोबाईल चोरीला गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असुन दिवसा ढवळ्या चोरट्यांनी मोबाईल लंपास केले असल्यामुळे पोलीस प्रशासनाची यंत्रणा थंड कशी असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हिमायतनगर शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून ते आंबेडकर चौक, ग्रामीण रुग्णालय, चौपाटी लकडोबा चौक यासह अन्य परिसरात विस्तार असुन ग्रामीण भागातील नागरिक बुधवारी बाजार करण्यासाठी मोठी गर्दी होते.या आठवडी बाजार चा फायदा घेत अनेकदा चोरट्यांनी मोबाईल…

Read More

हिमायतनगर | तालुक्यात येणारे मौजे टेंभी हे गाव “आदर्श गाव” म्हणून ओळखलं जातं. मात्र सध्या गावात काही ठिकाणी अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, महिलांचे आणि ज्येष्ठांचे जीवन असुरक्षित बनले आहे. हि बाब लक्षात घेता गावातील अवैदय दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा दिनांक १५ ऑगस्ट पासून संपूर्ण महिला पुरुष गावकरी अमरण उपोषण करणार आहेत असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने निवेदनातून देत गोविंद कदम यांनी थेट पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेतली आहे. ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, टेंभी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे अवैद्य दारू विक्रीमुळे गावातील…

Read More

हिमायतनगर | संपूर्ण महाराष्ट्रात 1 ऑगस्ट ते 7ऑगस्ट हा आठवडा महसूल सप्ताह म्हणून अतिशय उत्साहात राबवल्या जात आहेत. महसूल विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. महसूल सप्ताह निमित्त मौजे सिरंजनी येथे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे व हिमायतनगरच्या तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक तापमानातील वाढीमुळे व हवामान बदलामुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडां शिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात.…

Read More

माहूर| धनोडा येथे सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी सबंधित गुत्तेदाराने ३०० ब्रास मुरुम उत्खनन करण्याची परवानगी मागितली होती.त्या नुसार रीतसर महसूल भरून घेत ६ वाहनाद्वारे ६ दिवस अशी परवानगी माहूर च्या महसूल विभागाने दिली.मात्र रूई येथील सर्वे क्रमांक ५७ मधून ६ ऐवजी १० हायवा या महाकाय वाहनाने दोन पोचकलँड द्वारे बेसुमार उत्खनन केल्या जात असल्याने उत्खननाच्या ठिकाणची ईटीएस मोजणी करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केली आहे.तर खनिजाच्या धावणाऱ्या वाहनांमुळे विदर्भाला जोडणाऱ्या रुई रस्त्याला अवकळा प्राप्त झाली आहे. माहूर तालुक्यातील रूई येथील सर्वे नंबर ५७ मध्ये नियमबाह्य रित्या गौण खनिजाचा बेसुमार उपसा होत असून या उत्खननाला परवानगीची झालर…

Read More