Author: NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

हिमायतनगर, अनिल मादसवार| अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असला तरीही परंपरेला साजेसा असा वृषभराजाचा पोळा हिमायतनगर शहरासह तालुक्यातील गावोगावी उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावास्येनिमित्त पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना स्नान घालून पारंपरिक सजावट केली. वार्निश, घुंगरमाळ, मोरके, कासरे, गोंडे, झुली, नागेलीची पाने, बाशिंग अशा आकर्षक सजावटींनी सजलेले सर्जा-राजे गावोगावी दिमाखात नटले होते. महिलांनी सडा-संमार्जन करून शेतीअवजारे व पळसाच्या मेढ्याची पूजा केली. सायंकाळी नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची मिरवणूक मुख्याधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांच्या पूजनाने निघाली. ढोल-ताश्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक श्री परमेश्वर मंदिराचे दर्शन घेत शहरातील मुख्य…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| नांदेड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती क्षेत्रात दि. २२/०८/२०२५ रोजी एकूण ९०,०००/- वृक्ष लागवड करणे संबंधी वरिष्ठ कार्यालयच्या निर्देशनुसार नगर पंचायत माहूर साठी 4000 वृक्ष एकाच दिवसात म्हणजे शुक्रवार रोजी लावण्याचे आदेश होते याद आदेशास प्रतिसाद देत नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी मातृ तीर्थ कुंड परिसरातील जंगलाला लागून असलेल्या जागेत दि 22 रोजी चार हजार वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत केले. दि 22/08/2025 रोजी मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरअध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत माहूर शहरातील मातृतीर्थ तलाव या परिसरात मोठ्या प्रमाणात म्हणजेच 1900 वृक्षाचे चे वृक्षारोपण करण्यात…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून तर आज पर्यंत पावसाचा जोर जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कायम असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना ओला दुष्काळ जाहीर करा. आणि सरसकट हेक्टरी 50.000 (पन्नास हजार) रुपये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यास संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये तात्काळ जमा करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांचे सह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे. अतिवृष्टीची नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्हा माहिती व प्रसारण च्या माध्यमातून चित्रफिताद्वारे अतिवृष्टीचे नोंदविण्यात आलेले सार्वजनिक केले असून, शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरामध्ये वाहून गेल्याने पुरुष बालकांसह महिलां मृत्यू…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यात दि. १५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी अतिवृष्टी झाली त्यातल्या त्यात इसापूर धरणाचे १३ गेट उघडून पैनगंगा नदीत पाणी सोडन्यात आल्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येऊन शेताकाठच्या नाल्या ओढ्यांना प्रचंड मोठा महापूर आल्याने तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात महापुराचे पाणी गेल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले. तसेच गोठ्यावर बांधून असलेले पशुधन सुद्धा मृत्यू मुखी पडले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी औजारे व साहित्यांचे नुकसान झाले. तसेच गावातील काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी माहूर तालुका ए आय…

Read More

मुंबई| काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते. निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु निवडणूक आयोगाचा सध्याचा कारभार पहात त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. मतचोरीसाठी सत्ताधारी पक्षाला मदत करून लोकशाहीवर घाला घातल्याचा प्रकार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघड केला आहे. निवडणूकीत गैरप्रकार होत असल्याचे दिसत…

Read More

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (विदर्भ, ताणी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी मृत्तांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. आज नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत गुंडवळ येथे जलजीवन मिशन अंर्तगत पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत असून जि.प. प्राथमिक शाळा गुंडवळ तांडा च्या आवारात पाण्याचे टाके बांधकाम करण्याकरिता खड्ड्याचे खोदकाम करून ठेवले. परंतु सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही दिवसापासून त्या ठीकांनी टाकीचे बांधकाम झाले नाही. सदर खड्ड्या लगत अंगणवाडी असून अंगणवाडी मधील बालके खड्यात पडून दुखापत किंवा एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून काही जागरूक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास याबाबत कळविले असता ते जाणीवपूर्वक सदर ठिकाणचे टाकीचे काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. करिता आपल्या स्तरावरून ग्रामपंचायत गुंडवळ यांना आदेशित…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील सोनापीर दर्गाह परिसरात बिबट्याने परवा घोड्याची शिकार केली तर आज म्हशीची शिकार केल्याने परिसरातील नागरिकांत दहशत पसरली असून माहूर शहरात बिबट्याचा शिरकाव झाल्याने वन विभागाने सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याची चर्चा करत होत आहे आज सकाळी बिबट्याने एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या पारडीवर हल्ला करून शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक वनविभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करीत आहेत.परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याची माहिती वनविभागाला पूर्वीपासूनच होती. तरीदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ज्या शेतकऱ्याच्या म्हशीच्या बछड्याचा बळी गेला, त्यांनी याबाबत वनविभागाकडे तक्रार अर्ज दिला आहे. मात्र…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| महाराष्ट्रसह माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला होता माहूर गडावर आलेले हजारो भाविक पैनगंगा नदीवरील नवीन पूल बनले नसल्याने जुन्या पुलावरून पाच ते आठ फूट पाणी वाहत असल्याने तब्बल 18 तास पुलावरून वाहतूक बंद होती पर्यायी मार्गही व्यवस्थित नसल्याने हजारो भाविक पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर रांग लावून वाहनात अडकून बसले होते. सदरील परिस्थिती पाहून एआयएमआयएमचा ध्येयवेडा तरून तालुका अध्यक्ष शेख सज्जाद शेख अजिज तसेच युवक एआयएमआयएमचे तालुका अध्यक्ष फैजुल्लाखान जर्दुल्लाखान पठाण यांनी हजारो फळांसह पानी बाटल्यांचे वाटप दि 16 रोजी रात्रभर करून भाविकांचे आशीर्वाद मिळविले. दि 16 रोजी प्रचंड पाऊस पडल्याने दुपारपासूनच जुन्या पुलावरून पाणी…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| विशेष सहाय योजनेतून विधवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्ती लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीच्या दाखल्याचा तगादा लावला जातो. आता त्यातून सुटका होण्याची संधी ॲपमुळे उपलब्ध झाली असून निराधारांना आता घरूनचे हयात प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. या ॲपचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी गैरसोय टाळावी असे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे. बेनिफिशियरी ॲप तसेच आधार फेस आरडी ॲप या दोन ॲपचा उपयोग करून आपल्या स्मार्टफोन वरून घरबसल्या काही मिनिटांत हयात प्रमाणपत्र तहसीलदार माहूर यांच्याकडे दाखल करू शकतात. हे ॲप वापरून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांचा लाभ चालू…

Read More