हंडरगुळी येथे श्री.बाळुमामा पालखी दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी तर व्यापा-यांची पुन्हा झाली दिवाळी
हंडरगुळी/उदगीर/लातूर,विठ्ठल पाटील| श्री.संत बाळुमामा यांची मेंढरांसह पालखी गत पंधरा दिवसापासुन श्री.क्षेञ हंडरगुळी येथे वास्तव्यास असुन यांच्या दर्शनासाठी गत 15 दिवसापासुन रोज हजारो स्ञी,पुरुष भाविकांचा मेळा बाजार मैदानात जमत होता.आणि गत 15 दिवसात लाखों भाविकांची रेलचल दिसुन आली.तर सलग 15 दिवस— राञ महाप्रसाद भाविकांकडुन दिले जात होते.यामुळे कांही व्यापा-यांची दिवाळी नंतर पुन्हा चांदी व दिवाळी झाली.
आदमापुर येथील श्री.संत बाळू मामाचे शेकडो मेंढरांचा कळप,घोडा, व पालखी यांचे हंडरगुळी नगरीत 15 दिवसापुर्वी आगमन झाले.व यांच्या दर्शनासाठी हाळी सह परिसरातील 50/60 गावातील हजारो भाविक रोज गर्दी करत असत.दरम्यान दोनदा अवकाळी पाऊस आला तरीही भक्त मंडळींची संख्या वाढतच गेली.तसेच दि.8 रोजी हंडरगुळी नगरीतुन हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीची नगर प्रदक्षिणा / फेरी संपन्न झाली. यावेळी सबंध गावात सडा,रांगोळी टाकुन पालखींसह घोड्याचे पुजन करण्यात आले.
बाळुमामाचा हा सोहळा अत्यंत शांततेत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.तसेच रोज शेकडो स्ञी=पुरुष भक्त मंडळी सेवा करत होते.सलग पंधरा दिवस – राञ हंडरगुळी ता.उदगीर येथे श्री.संत बाळु मामाच्या भक्तीरसात लाखोंचा जनसमूदाय बाळुमामाच्या भक्ती मध्ये मग्न झाला होता.व यळकोटयळकोट जय मल्हार;श्री.संत.बाळु मामाच्या नावानं चांगभल.अशा घोषणा भक्तां च्या मुखातुन ऐकू येत होत्या.रोज हजारो भक्त दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी येत होते.एकंदरीत बाळु मामाची पालखी आली.व 15 दिवस मुक्कामी राहिल्यामुळे आम्ही धन्य— धन्य झालोत.अशी चर्चा हंडरगुळीकर करताना दिसतात….