हदगाव/हिमायतनगर/नांदेड। RDSS योजने अंतर्गत गावठाण फिडर काम चालू आहे. आष्टी सबटेशन ते बोरगाव लिंगापूर, वटफळी HT लाईनचे काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाला स्थगिती देण्यात यावी आणि चौकशी करून ठेकेदाराला दंड आकारून एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता साहेब, महावितरण कार्यालय, भोकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, हदगाव तालुक्यात महावितरण व शासना कडून 24 तास विजमीळावी म्हणून RDSS योजने अंतर्गत गावठाण फिडरचे काम चालू आहे. आष्टी सबटेशन ते बोरगाव, लिंगापूर, वटफळी जानारी HT, 11 KV लाईटचे काम चालू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्याकडून व गुत्तेदाराकडून अंदाजपत्रकातील नियम व आटी यांना पुर्णपणे धाब्यावर बसवून काम सुरु आहे. ज्या पध्दतीने काम करण्याची पध्दत अंदाजपत्रकात मध्ये लिहीली आहे त्या नुसार कोणतेच काम होत नाही.
सबटेशन आष्टी ते वटफळी, सातशिव फाटा खडी क्रेसर साठी HT, 11 KV रुद्रानी कंपनीच्या कामासाठी लाईट गेली आहे. त्या जुन्या पोल व मटेरीयल वापरले जात आहे. गावठाण फिडर नविन जानारी लाईटच्या कामावर रुद्रानी कंपनीच्या रिकाम्या जुन्या पोलवर लाईट जोडली आहे. पोलला सिमेंट कॉक्रंटचा वापर कमी करणे व त्यावर पाणी न टाकणे माती मिसरीत वाळूचा वापर करणे, पोल व्यवस्थित न उभे करणे, महावितरणच्या अधिकाऱ्याला व अभियंत्याला हे बोगस काम दिसत नाही का ? असा सवाल उपस्थित करून चालू असलेलं काम पाहायला सुध्दा त्यांना यायला वेळ मिळत नाही का..?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तात्काळ सुरु असलेल्या या कामाची कार्यकारी अभियंता भोकर यांच्या मार्फत तक्रारदार समक्ष चौकशी व्हावी, आणि अत्यंत निकृष्ठ काम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू पाहणाऱ्या ठेकेदार व संबंधित एजन्सीला ताकीद द्यावी. त्वरीत प्रभावाने हे काम स्थगित करुन उत्कृष्ठ काम होईल याची सोय करावी. आणि संबधित गुत्तेदारावर व अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी मुख्य अभियंता परिमंडळ नांदेड, अधीक्षक अभियंता परिमंडळ नांदेड व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभागीय कार्यालय भोकर, जि. नांदेड यांच्याकडे दिपक बाबुराव जाधव रा. वटफळी ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी केली आहे.