सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर वसुली साठी स्वच्छता निरीक्षकाचे सहकार्य…

नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या मालमत्ता करासाठी स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे हे गेल्या चार पाच दिवसापासून आपले स्वच्छता दैनंदिन कामे करून मालमत्ता वसुली साठी सहकार्य करत असून दैनंदिन चार ते पाच मालमत्ता धारकाकडुन वसुली करून संबधित कर निरीक्षक , वसुली लिपीक यांच्या कडे भरणा करत आहेत, यामुळे आर्थिक अडचणी मध्ये आलेल्या मनपास सर्व विभागाकडून सहकार्य केल्यास मालमत्ता कर १००/ टक्के वसुली साठी सहकार्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ.पजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शन खाली सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ६ येथील सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्या मार्फत मालमत्ता धारकाकडे असलेले थकीत कर व चालू वर्षाच्या करासाठी दोन पथके तयार करण्यात आले असून थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकाचे पाणी,ड्रनेज,सुविधा बंद करण्यात येत आहे,या मोहीमेला सहकार्य करण्यासाठी स्वचछेन कौठा प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे हे क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनेक मालमत्ता धारकांना भेटी देत असुन दैनंदिन चार ते पाच मालमत्ता धारकांकडुन वसुली करत आहे.
या मोहिमेला सहकार्य करत असल्याबद्दल उपायुक्त(महसूल) डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी अभिनंदन केले असून, मालमत्ता वसुली मोहीमे साठी सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी सहकार्य करन्याची ही मनपा इतिहासातील पहिली वेळ असून , सर्वांच्या सहकार्याने १००% मालमत्ता चा कर वसुली होईल असे बोलल्या जात आहे.
