उमरखेडक्राईमहिंगोली

नमिता चौधरी हिच्या मारेकऱ्यास अटक करा; आर्य वैश्य समाजाची उपविभागीय कार्यालयावर धडक

उमरखेड, अरविंद ओझलवार| छत्रपती संभाजी नगर येथील सौ नमिता कैलास चौधरी हिची आत्महत्या नसून खून झाला असून तिची हत्या करणाऱ्या सासरच्या मंडळीला त्वरित अटक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आर्य वैश्य समाज तालुका उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले .

छ .संभाजीनगर येथील सौ नमिता चौधरी हिचा 21 मार्च रोजी संशयास्पद मृत्यू झाला .याबाबत पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु नमिता चा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या आल्याचा आरोप नमिताच्या आई-वडिलांनी लावला असून, नमिताचा पती, सासरा, सासू व ननंद यांनी खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नमिताच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पळून जाण्याची फरार होण्याची संधी दिली असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची योग्य कारवाई न करता हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयास पोलिसांच्या वतीने होत असून, याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना सदर प्रकरण अवगत करून नमिताच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कारवाई करावी. अशी मागणी आर्य वैश्य समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोटगिरवार , डॉ. सचिन मामीडवार , डॉ गजानन कोडगिरवार ,किरण मुक्कावार , सचिन निलपवार , महेश पत्तेवार ,गजानन रेवनवार विडूळ ,उदय पत्तेवार , वैभव कोडगिरवार ,गोपाल मुक्कावार , गजानन व्यवहारे ,पिंटू पत्तेवार ,जगदीश भुसावळ सह सौ.स्वाती अमोल निल्लावार , सौ. कोमल रणजीत कोटगिरवार , सौ. संगीता गजानन व्यवहारे , सौ. श्रद्धा श्रीकांत मामीडवार , सौ.सुषमा रमेश उत्तरवार , सौ.प्रतिभा किशोर चक्करवार सह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!