नांदेडलाईफस्टाईल

तामसा व निवघा येथील ग्रामीण रुग्णालयास मुख्यमंत्र्याकडून विशेष बाब म्हणून मंजुरी

हदगाव/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदार सांघट येणाऱ्या मौजे तामसा व निवघा बा. येथील ग्रामीण रुग्णालयाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विशेष बाब म्हणून सूचना दिल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंजुरी दिली आहे. हिंगोली लोकसभेचे खा.हेमंतभाऊ पाटील व बाबुरावजी कदम कोहळीकर जिल्हाप्रमुख शिवसेना नांदेड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण रुग्णालय म्हणुन मंजुरी मिळाल्याबद्दल फटाक्याची आतिषबाजी करून आभार मानले जात आहे.

हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने जनतेची गेल्या पंचवीस वर्षाची मागणी आज पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशाने विशेष बाब म्हणून हदगाव तालुक्यातील मौजे तामसा व निवघा दोन या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयास अखेर मंजुरी देण्यात आली आहे.

परळी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त जात असतांना मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे नांदेड विमानतळ येथे जिल्हा प्रमुख ब्बुरॊ कदम यांनी स्वागत केले व मतदारसंघातील तामसा व निवघा (बा) येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर,जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर उपस्थित होते..!
परळी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त जात असतांना मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे नांदेड विमानतळ येथे जिल्हा प्रमुख ब्बुरॊ कदम यांनी स्वागत केले व मतदारसंघातील तामसा व निवघा (बा) येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर,जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर उपस्थित होते..!

 

तसेच निवघा व तामसा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तामसा व निवघा बा. येथे 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय म्हणुन मंजुर करुन आणल्याबद्दल साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर कार्यकर्त्याकडून टाकली जात आहे. एव्हडेच नाहीतर सण २०२० मध्ये रुग्णालय मागणीसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या पात्राची प्रत देखील टाकण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!