उस्माननगर,माणिक भिसे। समता मा.व.उच्च माध्यमिक वि.उस्माननगर ता कंधार येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या शिक्षण परिषदेत शालेय विद्यार्थ्योने चालकास गाडी चालवताना झोप येत असल्यास घ्याव्याच्या काळजीचे सादरीकरणाचे कौतुक केले.
समता विद्यालय येथे घेण्यात आलेल्या चौथ्या शिक्षण परिषद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख जे.एस. काळे हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लाठ( खुर्द )येथील मुख्याध्यापक श्री गादेकर , जि.प .के.प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती वांगे मॅडम, श्री एकनाथ केंद्रे यांची उपस्थित होती. प्रथमतः माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार पाहुण्याच्या हस्ते अर्पण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यीनिनी अतिथीचे स्वागत गिताने स्वागत केले .
त्यानंतर केंद्रप्रमुख काळे यांनी शिक्षण परिषदेत आलेल्या बीट अंतर्गत शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व आपल्या प्रस्ताविकातून शिक्षण परिषदेचे महत्त्व व परिषदेतील विषय व महत्व सांगीतले.त्यानंतर श्री केंद्रे ई.एस.यांनी आपल्या पहिल्या तासिकेत अध्यापनातील राष्ट्रीय संपादनुक असलेल्या अध्ययन निष्पती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.तसेच दुसरे सुलभक श्री पाटील गजानन यांनी पी जी एलव ऑनलाईन गुणदान या विषयाची माहिती सांगितली. चौथ्या तासिकेत श्री पाटील यांनी slash रिपोर्ट या विषयी माहिती सांगितली तसेच समता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री बाजीराव पाटील यांनी इंस्पायर अवाॅर्ड या विषयी माहिती सांगीतली व केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मध्ये इय्यता नवविच्या विद्यार्थ्यांनी नवनिर्मीत केलेल्या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
केंद्रशासना मार्फत विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी इंस्पायर अवाॅर्ड साठीचे आयोजन करण्यात येते त्या मध्ये यावेळी समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया तर्फे विज्ञान शिक्षक श्री परशुराम लामदाडे व श्री प्रतिक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्मित संकल्पना असलेले तीन वेगवेगळ्या प्रयोगांना नामांकन प्राप्त झाले आहे.त्या नामांकन प्राप्त झालेल्या प्रयोगाची सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले.यामध्ये ड्रायव्हरच्या झोपेमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी केलेला प्रयोग विद्यार्थी सम्यक कांबळे यांनी त्यानी बनविलेल्या प्रयोगाचे सादरीकरण केले. घरात बसून पाऊस आलेला माहिती होण्यासाठी बनवलेल्या प्रयोगासाठी नाजमीन सय्यद हीने सादरीकरण केले.
तसेच स्ट्रक्चर मध्ये बदल करून अपघाताचे प्रमाण ९५ टक्के कमी आणि जीवितहानी प्रमाण ९९ टक्के कमी करण्यासाठी केलेल्या प्रयोगासाठी शिवभक्ती मुदखडे ,मोहिनी घोरबांड, पूजा वारकड, अंजली शेकापुरे, उपाली सोनसळे, यांनी देखील नामांकन प्राप्त केले आहे . यानंतर श्री वाघमारे यांनी इंग्रजी विषयाची यशोगाथा घेऊन शेवट सहशिक्षक एकनाथ केंद्रे यांनी शैक्षणिक व्हीजीओ निर्मिती स्पर्धा या विषयाचे महत्त्व स्पष्ट केले व शैक्षणिक व्हिडिओ कसे बनवायचे व कोणते बनवायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास शिराढोण व उस्माननगर बीट अंतर्गत केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाजीराव पाटील यांनी केले.