भ्रष्टाचाराच्या चौकशी प्रति उदासीन असलेल्या नांदेड महापालिकेला ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा विसर
नांदेड। नांवाश मनपा वर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अतिवृष्टी निधी वाटप घोटाळ्या सह सिसिटीव्ही कॅमेरा घोटाळा,दिवाबत्ती घोटाळा,ड्रेनेज लाईन घोटाळा,पदोन्नती घोटाळा, कचरा घोटाळा, वृक्षतोड घोटाळा, गुंठेवारी आणि बांधकाम परवानगी घोटाळा,बोगस सफाई कामगार घोटाळा,बनावट पावती घोटाळा,वाहन दुरुस्ती बोगस बील घोटाळा,घरकुल घोटाळा,ओपन स्पेस जमीन घोटाळा तसेच दिवाबत्ती घोटाळ्या सह मनपाच्या विविध विभागात राजरोसपणे अनेक घोटाळे करून स्वतःचे उकळ पांढरे करणे तेथील अधिकाऱ्यांना नित्याचेच झाले आहे.कारण येथे कुणाचाच कुणावर अंकुश राहिला नाही.
या घोटाळ्या शिवाय आणखी अनेक घोटाळ्याची विभागीय महसूल आयुक्त संभाजी नगर, विभागीय समिती आणि सीआयडी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून हडप केलेली रक्कम वसूल करावी आणि संबंधितांना कायमचे सेवेतून बडतर्फ करावे म्हणून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (जमसं) ने साखळी अमरण उपोषणाचे संवेधानिक शस्त्र उपसले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दि.२९ जानेवारी पर्यंत डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर पुतळा ते महावीर चौक पर्यंत आंदोलनास बंदी घातल्याने तात्पुरते आंदोलन थांबविण्यात आले आहे.ते ३० तारखेपासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु करण्यात येणार आहे व पुढील सुरु होणाऱ्या आंदोलनाचा ९५ वा दिवस असणार आहे.
विशेष म्हणजे वरील दोन्हीही संघटना ह्या राष्ट्रीय संघटना असून या संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांनी या उपोषणातील मागण्याची दखल घेतली आहे. पुढील महिन्यात २२ फेब्रुवारी रोजी माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्या तथा जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या,मार्गदर्शक सल्लागार माजी खासदार कॉ.वृंदा करात ह्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
तसेच माकप पॉलिट ब्युरो सदस्य तथा नाशिक ते मुंबई शेतकरी लॉंग मार्चचे प्रणेते व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.डॉ.अशोक ढवळे हे देखील याच दौऱ्यात असणार आहेत आणि किनवट येथे होणाऱ्या जाहीर सभेस ते संबोधित करणार आहेत. त्यांना देखील नांदेड मनपाच्या काळ्या कहाणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
उपरोक्त माकप आणि राष्ट्रीय जन संघटनांचे नेते जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना बोलण्याची शक्यता आहे.एबीपी न्यूज २६ जानेवारी २०२४ अपडेट नुसार, २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्यात साकेत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्टध्वजाला मानवंदना दिली असे गुगलवर शासनाचा हवाला देत प्रसिद्ध केले आहे. म्हणून संपन्न झालेला हा प्रजासत्ताक दिनाचा कितवा वर्धापन दिन होता या संदर्भाने संभ्रम निर्माण झाला येवढे मात्र खरे आहे.
श्री लहाने गेले अन् श्री डोईफोडे आले,वसुली वाढली पण समाधान नाही झाले, श्री कदम मात्र वसीलेबाजीने अतिरिक्त झाले, अन् महापालिकेत भ्रष्टाचाराचे कुरण वाढतच गेले, लोकप्रतिनिधी करीत आहेत लुटालूट, अधिकाऱ्यांमध्ये आहे फाटाफूट, जनतेमध्ये होत आहे ताटातूट, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी आता खुली करणे आवश्यक आहे आपली वज्रमुठ, कॉ.गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सीटू नांदेड जिल्हा कमिटी तथा राष्ट्रीय इंग्रजी वृतपत्र ” द हिंदू ” चे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते
कर्तव्यदक्ष असल्याचा आव आणणाऱ्या नांदेड महापालिकेच्या प्रशासनास कितवा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. हे माहिती नसने हे खेदजनक असून या बद्दल सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.यावर्षी २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश ७५ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत असताना नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेने मात्र ७४ वा प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिवस साजरा केला आहे. महापालिकेने शहरातील काही विशिष्ट मान्यवरांसाठी काढलेल्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहना च्या निमंत्रण पत्रिकेवर ७४ वा प्रजासत्ताक वर्धापन दिन असे लिहून निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे.
अशी एक निमंत्रण पत्रिका सीटू आणि जमसंच्या हाती लागली असून ती दैनिक भास्कर (देशातील आघाडीचे व सर्वाधिक खपाचे हिंदी वृत्तपत्र) संपादक,नांदेड यांना देण्यात आलेली आहे.या निमंत्रण पत्रिकेमुळे मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. अशी माहिती कॉ.गायकवाड यांनी दिली आहे.