कृषीनांदेड

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन

नांदेड| कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर या पंधरवड्यात विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून या योजनेअंतर्गत लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

कृषि विभागामार्फत तालुकास्तरावर आयोजित मेळाव्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने सामुहिक शेततळे, वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस, 20 एचपीच्या आतील छोटे ट्रॅक्टर, पावर टीलर, प्लास्टिक मल्चींग, हरितगृह, शेडनेट हाऊस, शितगृह, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांची तसेच ठीबक व तुषार सिंचनबाबत माहिती देण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!