अण्णाभाऊच्या क्रांतिकारी विचाराची भूमिका नव तरुणांनी घ्यावी – सचिन साठे यांचे प्रतिपादन
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। अनेक समाज संघटितपणे प्रगतीच्या मार्गाने जात असताना आपण सर्वात शेवटी राहिलो आहोत याचे भान समाज तरुणांनी मनात ठेवून समाजावरील विविध प्रश्नासाठी मजबूत संघटन महत्त्वाचे आहे समाज बदलावासाठी संघटनेबरोबर सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी विचाराची भूमिका आजच्या नव-तरुणाने घ्यावी असे प्रतिपादन डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांनी आयोजित बैठकीत व्यक्त केले.
तेलंगणातील सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठेच्या पुतळा अनावर प्रसंगी जात असताना नरसी येथील शासकीय विश्रामगृह येथे अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते यासह सदर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राज क्षीरसागर,प्रा. डॉ .शंकर गड्डमवार, रा.ना. मेटकर, जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, सुजलेगावचे सरपंच दत्ता आईलवार, माजी पंचायत समिती सदस्य संभाजी शेळके, माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी नामदेव कांबळे, संजय बोथीकर ,किशोर कवडीकर, मालोजी वाघमारे अधिजनाची प्रमुख उपस्थिती होती.
सचिन साठे बोलताना पुढे म्हणाले की मी महाराष्ट्रात फिरत असताना समाजाची दुःख दारिद्र्य अन्याय व उपेक्षितांची जीवन जगणे जवळून पाहत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी या व्यवस्थेवर अण्णाभाऊंनी सांगितलेला घालच घातला पाहिजे म्हणून बिनी वरती धाव घेण्यासाठी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना कार्यरत असून समाजाच्या उर्जेवर व ताकतीमुळे महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला मला न्याय देता आला यापुढे लढा तीव्र करण्यासाठी समाज तरुणांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर कोतेवार,उत्तम गायकवाड, प्रभाकर गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, रामचंद्र नेहरू, रंजीत गोरे, अक्षय बोयाळ, पूनम धमनवाडे, साहेबराव धसाडे, आनंदा संत्रे, दिगंबर झुंजारे, गजानन खुणे, साहेबराव धसाडे, आनंदा संत्रे, बालाजी रानवळकर, विजय भरांडे, राजेंद्र रेड्डी, प्रभाकर घंटेवाड, संतोष वाघमारे ,परमेश्वर धसाडे, विलास झिंजोरे, परमेश्वर वाघमारे, शिवाजी बोईनवाड ,मारुती झुंजारे, पृथ्वीराज आईलवार ,आकाश घोडजकर, भागवत घंटेवाड, यासह अधिजनाची उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राचार्य पंढरी कोतेवार यांनी केले.
डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची नायगाव तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड करून सदर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते सन्मान करून नियुक्तीपत्र देण्यात आले.