उस्माननगर। मौजे उमरज ता. कंधार जि. नांदेड येथे नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी अंतर्गत संत नामदेव महाराज पाणलोट विकास समिती उमरज यांच्या माध्यमातून जनावरांचे व्यंधत्व तपासणी व जनावरांना होणाऱ्या विविध आजारांवरील लसीकरणास पशु पालकांनी जनावरांची तपासणी करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील डॉ. निहाल मुल्ला हे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते तर डॉ. प्रकाश हाके ( पशुधन विकास अधिकारी माळाकोळी) व डॉ. परमेश्वर डावळे( पशुधन पर्यवेक्षक ) यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तसेच गावचे उपसरपंच गणपत शिवाजी राठोड यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉ. निहाल यांनी जनावरांमध्ये व्यंधत्व येण्याचे कारणे सांगितले व तसेच पशुपालन मध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, म्हैश व गाय पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान बदलानुसार जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम व त्या परिणामाची काळजी घेणे तसेच जनावरांच्या अंगावरील गोचीड निर्मूलन करण्यासाठी घरगुती उपाययोजना सांगितल्या व तसेच जनावरांना सकस चारा व्यवस्थापन करणे त्यामुळे जनावरांमध्ये व्यंधत्व होणार नाही.
तसेच गोठा स्वच्छ ठेवणे सतत गोठा ओला राहणार नाही अशा प्रकारे जनावरांची निगा राखावी असे आव्हान डॉ. प्रकाश हाके माळाकोळी यांनी जनावरांच्या वजनानुसार चारा व्यवस्थापन करावे तसेच व्यंधत्व तपासणी करतेवेळी त्यांनी विविध जनावरांचा गर्भधारणा कालावधी सांगितले व तसेच जनावरात सतत एक प्रकारचा चारा न देणे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अन्नद्रव्याची व्हिटॅमन्सची कमतरता येऊ शकते त्यामुळे विविध नेपरियर गवत, गजरा गवत ,मुरघास अशा प्रकारचे जनावरांना खाद्य देणे व तसेच व्यंधत्व निवारण्याबाबत माहिती सांगितली सोबत जनावरांच्या नाकाला बिले मारणे तसेच लसीकरणांमध्ये ( लाल खुरपत लस ) देण्यात आले .गर्भधारणे करता जंतनाशक औषधे देण्यात आले, व्यंधत्व निवारणासाठी व माजावर न येणाऱ्या जनावरासाठी गर्भधारणा होण्यासाठी प्रोसिडीन आयोडीन देण्यात आले.
तसेच फ्रटीव्हिट व इटाली गोळ्या देण्यात आल्या. सोबत आम्हीत्राझ हे औषधी गोचीड निर्माण करण्यासाठी देण्यात आले. सदरील कार्यक्रम गंगाधर कानगुलवार – प्रकल्प व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती जोगपिटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रदीप कुमार भिसे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण चव्हाण, राहुल तोरणे, राजेश घोडजकर ,नागनाथ पदंपल्ले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.