नांदेडसोशल वर्क

लोककलावंतांच्या न्याय व हक्कासाठी सदैव प्रयत्नशील श्रीमती शांताबाई पाटील जवळगांवकर

वडगाव /पोटा, पांडुरंग मिराशे। आपल्या कलेच्या माध्यमातून लोकपारंपारिक कलावंतांनी प्रत्येक क्षेत्रांच्या उन्नतीसाठी प्रबोधनातून जनजागृती करावी जिल्ह्यातून दरवर्षी किमान ५०० कलावंतांना मानधन मिळावे यासह आपल्या विविध प्रश्नांच्या निवारणासाठी आपण शासनदरबारी जागरुकपणे प्रयत्नशील असून यापूढेही आपल्या न्याय व हक्कासाठी सदैव कर्तव्यतत्पर राहिल अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शांताबाई निवृत्तीराव पाटील जवळगांवकर यांनी दिली. स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड,बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र (सांस्कृतिक विभाग) व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा व लोकपारंपारिक कलावंत शाहीर मेळाव्यात दि.१९ जानेवारी रोजी मौजे पोटा (बु.) येथे त्या बोलत होत्या.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कलावंत दत्ता गड्डलवाड हे होते.जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. माळोदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन करण्यांत आले. तर,व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून श्रीमती सुमनबाई भवरे,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ.उज्वला भवरे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर,जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवड समितीचे सदस्य,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मिलींद गायकवाड,कार्यकारी अभियंता अशोक भोजराज,डाॅ.विलास ढवळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी,हिमायतनगर बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड,योगेश चिलकावार,सरपंच प्रतिनिधी दत्ता पवार,दिगांबर इंगळे पाटील,कानबा पोपलवार, जयभिम पाटील,बाबाखान,रमेश गंगासागरे,सुरेश कावळे,कैलास कानिंदे,मनोज शिंदे,ज्ञानेश्वर पंदिलवाड यांच्यासह व्यासपीठावर मेळाव्याचे स्वागताध्यक्ष कैलास माने पोटेकर,शेख रफिख भाई संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे, ग्रामविकास अधिकारी व्हि.जी.जकीलवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे सदस्य ह.भ.प.पंढरीनाथ मुरकुटे महाराज,शाहीर सुर्यकांत शिंदे,पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी पि.डी.गायकवाड, विठ्ठलराव देशमवाड, वनपरिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर धोंगडे, सौ.डी.डी.विभूते,पो.हे. काॅ.अशोक शिंगनवाड,कृषी विस्तार अधिकारी विजय जंगीलवाड,सहशिक्षका सौ.प्रमिला रायबोळे-ढवळे,रुपेश मुनेश्वर,सुनिल भुताळे, टि.आर. आडबलवार,सटवाजी पवार जवळगांवकर,पत्रकार हमीदखाॅ पठाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

मेळाव्याचे आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका विषद करतांना विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान देत कर्तव्यतत्पर असलेल्यांना प्रेरणा देण्यासाठीच आम्ही दरवर्षी पुरस्कार प्रदान करित असल्याचे स्पष्ट केले. तसेच,समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या लोककलावंताचे सद्याचे प्रश्न मांडले. याप्रसंगी बोलतांना जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी.माळोदे म्हणाले की,आपली संस्कृती जोपासीत प्रबोधनातून जनजागृतीचे महान कार्य लोकपारंपारिक कलावंत करित असतो. विविध समाजघटकांप्रमाणेच त्यांच्याही समस्या व न्याय, हक्काची जाणीव आपणांस असून त्यासाठी दरवर्षी मेळाव्यांच्या माध्यमातून बहुजन चळवळीतील अग्रेसर नेतृत्व असलेले त्रिरत्नकुमार मा.भवरे हे सर्वांना एकत्रित करुन कर्तव्यतत्परतेने कार्यरत असतात हि बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण आपल्या न्याय व हक्कासाठी सदैव प्रयत्नशील असून नांदेड जिल्हास्तरीय मानधन निवड समिती पूनर्गठित व्हावी यासाठीही आपण प्रयत्नशील होतो.

या माध्यमातूनही अनेकजण मानधनासाठी पात्र ठरले. परंतू, कलावंतांची वाढती संख्या पाहता आपल्या मागणीनुसार जिल्ह्यात दरवर्षी किमान ५०० कलावंतांना मानधन मिळावे यासह अनेक प्रश्नांसाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरुच असल्याचे ते म्हणाले.गत दोन वर्षांपासून कलावंताचे रखडलेले मानधन व कलावंत मानधन निवड प्रक्रियेत सुलभता यावी यासाठीही सदैव कर्तव्यतत्पर असल्याचे सांगून त्यांनी दरवर्षीच प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान असलेल्यांना व मुख्यत्वे जिल्हा परिषद, पंचायत समिती-गांव पातळीवर कार्यरत अधिकारी- कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेऊन दिलेल्या पुरस्कारांसाठी आभार व्यक्त केले तसेच, पुरस्कार प्राप्त व्यक्तींची जबाबदारी वाढल्याचे सांगून त्यांनी जोमाने शासकीय सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेसाठी तत्पर व्हावे असे आवाहनही शेवटी माळोदे यांनी केले.

या सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा.उत्तम कानिंदे व लक्ष्मणराव भवरे यांनी तर,उपस्थितांचे आभार स्वागताध्यक्ष कैलास माने पोटेकर यांनी मानले. या मेळाव्यात जादूगर शेख रफिखभाई,शाहीर रमेश नारलेवाड, शाहीर नरेंद्र दोराटे, शाहीर शंकर गायकवाड,शाहिर बळीराम जाधव,शाहीर बापुराव जमदाडे,सोनाली भोकरकर, संध्या माहूरकर,नयना पूणेकर, शाहीर बाबुराव गाडेकर,शाहीर विकासराजा, सचिन कांबळे, बालगायक सार्थक जाधव,सिधू कवडे, शाहीर सोनटक्के,सुमेध एडके,सुरेखा रंगारी,कल्याण डोणेराव, शाहीर माधव वाघमारे,शाहीर पांडुरंग मिरासे,सविता गोदाम,शाहिर देवकांबळे, शाहिर धम्मा जाधव,गायीका जयश्री पोतरे, नागिनी हनवते, उत्तम भगत, राजेंद्र कांबळे आदींनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्यासह जगन्नाथ नरवाडे,शेख खय्युम,शिवाजी डोखळे, नागोराव मेंडेवाड, जळबा जळपते,परमेश्वर वालेगांवकर, गौतम राऊत,नागनाथ वच्चेवार, अविनाश कदम,केशव माने,पांडुरंग मिरासे,लक्ष्मीबाई मिरासे,सुरेखा डोखळे, लक्ष्मीबाई जळपते, सुनंदा मेंडेवाड,वनमाला वच्चेवार, लक्ष्मीबाई वालेगांवकर, सुमनबाई माने,लक्ष्मीबाई खरवडे, शाहीर पाडुरंग हापसेवाड,देविदास उदगीरे, विजय वाठोरे, बालाजी राऊत,नारायण जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यास मराठवाडा- विदर्भासह लगतच्या आंध्रप्रदेश,तेलंगणा राज्यातील लोकपारंपारिक कलावंत तसेच,जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, लोकप्रतिनिधी,पत्रकार व जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!