
हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यात कोणत्याही रेती घाटचा लिलाव झालेले नाही. तरी सर्व घाटातुन रेती उपसा सुरु आहे अवैध रेती शहरासह तालुक्यात कुठंही सहज उपलब्ध होतांना दिसुन येत आहे. एक प्रकारे रेतीचा महापूर असल्याच दिसुन येत आहे. त्यामुळे महसुल विभाग व पोलिस कार्यशैली त्यास कारणीभूत असल्याच स्पष्ट जाणवत आहे. यामुळे खऱ्या गरजूना काळ्या बाजारातील मनमानी भावाने रेती विकत घ्यावी लागत असून, हि लूट थांबवून शासनाचा महसूल वाढविण्यासाठी अल्प दरातील रेती डेपो सुरु करून घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.
पावसाळ्या पुर्वी प्रशासनाने निश्चित केलेले जे रेती घाट आहे त्या घाटचा लिलावच झाला नसल्याचे प्रशासकडुन सागण्यात आले. परणौ त्याच घाटातुन रेती माफीयांनी खुले आम रेती उपसा सुरु केला आहे. प्रचंड प्रमाणात गुप्त ठिकाणी साठे करुन ठेवल्याच स्पष्ट जाणवत आहे. या अवैध साठ्या विषयी काही प्रमाणात ओरड होताच नेहमी प्रमाणे स्थानिय प्रशासन कागदोपञी कारवाई करुन नेमके तो रेती साठे कुठे गायब झाले या बाबतीत उलटसुलट चर्चा ऐकवायास मिळत आहे.
किती अवैध रेती साठे प्रशासनाने जप्त केले त्याच लिलाव झाले आहे का..? ते कश्या प्रकारे झाले हे कागदोपञी असल्याची माहीती मिळाली. या बाबतीत तहसिलच गौणखनिज विभाग ‘मौण’ पाळुन आहे. सदर अवैध रेती साठे कुठे तरी गुप्त ठिकाणी करण्यात आलेले असुन हीच रेती चढ्या भावाने रेतीमाफीया शहरात व परिसरात विक्री करतांना दिसुन येत आहे. शहरात व तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक राञीला जोरात असते. विशेषतः प्रशासकीय सुट्टीच्या दिवशी तर जोरात असल्याची माहीती आहे. माञ स्थानिय पातळीवर प्रशासन व बैठे पाठक या बाबतीत ‘मौण बाळगून बघ्याची भूमिका वठवित असल्याच दिसुन येते.
दिवस ढवळ्या शहर व परिसरातून रेतीची व्हूक होताना प्रशासन माञ हे सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी दररोज पाहत आहे. माञ कारवाई का..? होत नाही असा सवाल ही काही जागरुक व पर्यावरण प्रेमी नागरिक करतांना दिसून येतात. अणखी विशेष म्हणजे रेती अभावी शहरात किवा ग्रामीण भागात कोणतेही बाधकाम घरकुलाचे काम थांबलेल नाही. शहर व ग्रामीण भागात मोठ मोठया भव्यअश्या बांधकाम व ले-आवूट तसेच शाँपिंग काँम्पलेक्स उभे होतांना दिसुन येत आहेत. शहरात व ग्रामीण भागात फेरफटका मारला आसता अनेक ठिकाणी मोठमोठे बांधकामे दिसुन येतात यात स्थानिय प्रशासन व ग्रामस्तरीय प्रशासनाचे कर्मचारी अधिका- यांची ‘भूमिका’ सडोळे असून, आंधळ्यांची भूमिका घेतल्याचे स्पष्ट जाणवत आहे हे आवर्जुन उल्लेख करावा लागेल…!
