नांदेड| येथील अक्षरोदय साहित्य मंडळाकडून स्मृतीशेष विठ्ठलराव जोंधळे पुरस्कार शाहीर रमेश गिरी यांना लोकशाहीर विठ्ठलराव जोंधळे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी दि. ०१.०१.२०२४ रोजी मान्यवर यांच्या हस्ते संवाद सभागृह महावीर सोसायटी या ठिकाणी प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिका मा. छायाताई बेले होत्या व ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मा. ज्येष्ठ साहित्यिका विमलताई शेंडे व मंडळ अध्यक्ष मा. मारोती मुंडे हे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप शाल सन्मान चिन्ह प्रमाणपत्र हे होते ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारे यांनी मंडळाचे व सत्कारमूर्ती यांचे कौतुक केले शाहीर रमेश गिरी यांना पुरस्कार देऊन मंडळाने शहिराचा यथोचित सन्मान केल्याचे ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी सांगितले मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले लागलीच प्रमुख पाहुण्या मा. विमलताई शंडे यांनी शौर्य दिनाच्या शुभेच्छा देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मा. छाया बेले यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की कविता हे स्व वेक्त होणारे एक प्रभावी माध्यम आहे. लागलीच पहिल्या सत्र समाप्त झाले.
दुसरे सत्र कवी संमेलन चालू करण्यात आले या संमेलनात कवी अनुरतन वाघमारे कवी हिंगमिरे सर कवी बालिका बरगळ कवी डोंगरे सर कवी भंडारे सर कवी साईनाथ रहाटकर कवी उषाताई ठाकूर कवी चंद्रकांत चव्हाण कवी सदानंद सपकाळे कवी मारुती मुंडे यांनी आपल्या सरस कविता सादर केल्या या संमेलन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह सदानंद सपकाळ यांनी केले कार्यक्रमाचे आभार सहसचिव चंद्रकांत चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमासाठी डॉ. विजयकुमार माहुरे यांनी आपले संवाद सभागृह मंडळास दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मारुती मुंडे उपाध्यक्ष सिंधुताई सचिव नरेंद्र धोंगडे सहसचिव चंद्रकांत चव्हाण कोषाध्यक्ष उषाताई ठाकूर कार्यवाह सदानंद सपकाळे यांनी काम पाहिले