उमरखेड येथे अखंड शिवनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन
उमरखेड,अरविंद ओझलवार। येथील छञपती शिवाजी वार्डातील महात्मा बसवेश्वर संस्थांन शिवमंदीरामध्ये येत्या शनिवार दिनांक २ मार्च २०२४ पासून गुरुमाऊली राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले असून सप्ताहात दररोज सकाळी पाच ते सहा शिवपाठ व शिवनाम जप,सहा ते सात अभिषेक व आरती, आठ ते दहा परमरहस्य पारायण ,दुपारी दोन ते चार गाथा भजन, दुपारी चार ते पाच शिवपाठ व शिवनाम जप ,तसेच दररोज रात्री शिव कथाकार शि.भ.प. सागर महाराज वाशिम यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.दररोज राञी अकरा ते सकाळी पाच पर्यंत शिवभजन व शिवजागर होणार आहे.
सप्ताहात सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी सकाळी दहा वाजता गु.ष.ब्र.१०८ रुद्रमुणी शिवाचार्य महाराज मुदखेडकर यांचे आशिर्वचन होणार आहे, तसेच मंगळवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सकाळी दहा वाजता गु.ष.ब्र.१०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव यांचे आशिर्वचनाचा लाभ भक्तांना मिळणार आहे.गुरुवार दि.७ मार्च २०२४ रोजी सकाळी दहा वाजता जागतिक महिला दिनानिमित्त “नारी सन्मान” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सौ. रजनीताई वगरकर नागपूर यांच्या मार्गदर्शनात सामूहिक इष्टलिंग पूजेचे सकाळी आठ ते दहा पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी एक ते तीन पर्यंत सर्व भजनी मंडळांचा शिवभजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून, दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत शि.भ.प. सौ.रत्नमाला विनोद हादगावकर यांचे टाळआरती कीर्तन,चार ते पाच पर्यंत शिवपाठ ,सायंकाळी सहा वाजता महाआरती होईल तसेच रात्री सात ते दहा वाजेपर्यंत शिवकथाकार शि.भ.प. सागर महाराज वाशिम यांच्या शिवमहापुराण कथेचे भव्य प्रमाणात समापन होणार आहे.
रात्री ठीक बारा वाजता महादेवास रुद्राभिषेक होईल. शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथराज परमरहस्य पारायण ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, दुपारी बारा पासुन शि.भ.प. भूषणस्वामी वाखारीकर यांचे प्रसादावरील किर्तन होईल.दुपारी एक वाजता गुरुवर्य ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांचे आशिर्वचन होईल. त्यानंतर दुपारी चार वाजेपासून महाप्रसादास सुरुवात होईल.
संपूर्ण सप्ताहात परमरहस्य पारायण व्यासपीठ शि.भ.प. रजनीताई वगरकर सांभाळतील ,शिवपाठ, शिवनाम जप, गाथा भजन, शिव किर्तना मध्ये मारोती पाटील , बालाजी पाटील व मृदुंगाचार्य तुकाराम बेळीकर तसेच गायिका शि.भ.प. रत्नमाला विनोद हदगावकर साथसंगत करतील. दैनंदिन अभिषेक व आरतीचे पंचाक्षरी महाराज खडकेश्वर हे पौरोहित्य करतील.गेल्या बारा वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहातील सर्व कार्यक्रमाचा उमरखेड शहरातील व परिसरातील सर्व शिवभक्तांनी लाभ घेऊन यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या शिवमहापुराण कथा सुद्धा श्रवण करावी. असे आवाहन अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समिती व महात्मा बसवेश्वर संस्थान तर्फे करण्यात येत आहे.