कारला येथे श्री कृष्ण मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
हिमायतनगर। कारला येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री कृष्ण मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून सप्ताहला शुक्रवार पासून सुरूवात झाली असुन श्री कृष्णाच्या अभिषेक केला आहे. या भक्तीमय सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कारला येथे श्री कृष्ण मंदीर कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आयोजन दि.12 जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे. सप्ताह च्या पहिल्या दिवशी सकाळी श्री कृष्णा चा अभिषेक ह. भ. प. शिवाजी महाराज जाधव,देवकर रामराव बर्लेवाड,नागोराव चव्हाण,दत्ता चिंतलवाड,रामराव लुम्दे, दत्ता गुफंलवाड, परमेश्वर इटेवाड, शंकर मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला हा सप्ताह 19 जानेवारी रोजी पर्यंत सप्ताह चालणार आहे.
या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन होणार आहे. या सप्ताहातील किर्तनकार ह. भ. प.गजानन महाराज तामसेकर, ह. भ. प.शितलताई महाराज सोळंके,ह. भ. प.लक्ष्मण महाराज बोरगडीकर, ह. भ. प.महारुद्र स्वामी महाराज दैठणेकर, ह. भ. प.शिवाजी महाराज मरळक,ह. भ. प.कृष्णा महाराज बोंपीलवार कार्लेकर, ह. भ. प.महेश महाराज शेवाळकर, या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे काल्याचे किर्तन ह. भ. प.प.महेश महाराज शेवाळकर यांचे होणार आहे.
या सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह. भ. प. शिवाजी महाराज वडगावकर, हरिपाठ व काकडा ह. भ. प. मारोती महाराज राहूलवाड व त्यांचा संच सिबदरा असणार गायनाचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बोटेवाड, ह. भ. प मारोती महाराज, ह. भ. प आनंद महाराज गोसलवाड, ह. भ. प भगवान महाराज गुंफलवाड, ह. भ. प मृदगंचार्य ह. भ. प. पांडुरंग भिसे, ह. भ. प. साईनाथ महाराज,तबलावादक ह. भ. प. श्रीराम आकेमवाड, हार्मोणीयम ह. भ. प. रामदास महाराज बोंपीलवार, चोपदार ह. भ. प. रामजी महाराज, विणेकरी अशोक महाराज बोंपीलवार,विलास सुरेशे यांची साऊंड सिस्टीम विनोद साऊंड असणार आहे.
दि.18 जानेवारी रात्री नादब्रह्म संगीत विद्यालय नांदेड संचालक सचिन बोंपीलवार, कृष्णा बोंपीलवार व यांच्या संचाचा मैफिली चा कार्यक्रम होणार आहे . या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कृष्ण मंदीर कमिटी व कारला ग्रामस्थांनी केले आहे.