लोहा| जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भोवती फिरते आहे. राज्यात या दोन्ही नेत्याचा विरोध सर्वश्रुत झालं लोकसभा निवडणूकीत अशोकरावांचा पराभव झाला. आणि राज्याच्या राजकारणात प्रतापराव जायंट किलर ठरले. २००७ नंतर म्हणजे तब्बल १७ वर्षा नंतर हे दोघे ही नेते एकाच पक्षात एकाच नेतृत्वात – एकाच जिल्हयात एकत्रित येत आहेत. पण समझोता होईल (?) याकडे जिल्ह्यासह मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे एकेकाळी कौंट्रेबिक’ आपूलकी जिव्हाळयाचे नाते होते. २००७ पर्यंत एकत्रित होते. परंतू तत्कालीन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड मनपा निवडणुकीत २००७ मध्ये लोकभारती या पक्षाच्या वतीने उमेदवार स्वतंत्र रित्या मैदानात उतरविले त्या व अन्य घटनेमुळे या दोन्ही नेत्यांत “कटुता” आली. तत्पूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या सोबत प्रतापराव काँग्रेस पक्षात होते. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या ततालमीत तयार झालेले प्रतापराव यांनी राजकीय पातळीवर अशोकरावांना नेहमीच खंबीरपणे साथ दिली होती.
२००४ मध्ये प्रतापराव कंधार मधून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांना पाठीबा दिला. काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले परंतु या काळात अशोकराव – प्रतापराव यांच्यात सुप्त विरोध सुरु झाला होता. २००७ च्या नांदेड मनपामध्ये तो उजागर झाला. तेव्हा पासून ते एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. प्रतापरावांचे काँग्रेस सहयोगी सदस्यत्व रद्द केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी आमदार असलेल्या प्रतापरावांची कोंडी केली शिवाय २००९ च्या विधानसभेत काँग्रेसचे सहयोगी आमदार असतानाही कंधार आता लोहा विधानसभा मतदारसंघात चिखलीकरांचा पता कट्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडली व प्रतापरावांचे कट्टर विरोधक शंकर अण्णा धोंडगे याना (२००९) निवडून आणले. दोन्ही नेत्यात टोकाचा विरोध आरोपप्रत्यारोप सुरू झाले.
माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांचे निधन झाले. राजकीय दृष्ट्या पोरके झालेल्या प्रतापरावांनी ” राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्याचे एकेकाळचे कट्टर विरोधक शंकरअण्णा धोंडगे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांना अशोकराव चव्हाण यांची साथ होती. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उमेदवार होते. प्रतापराव पाटील- शंकर अण्णा धोंडगे व अशोकराव चव्हाण या तिन्ही नेत्यांच्या दोन्ही तालुक्यात प्रचार झाला. प्रतापराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते – आघाडी मूळे त्यांनी अशोकरावांसाठी ‘ स्टेज’ वर गेले. विजयी करण्याचे अहवान केले नवा मोंढा येथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या प्रचार सभेत ते व्यासपीठावर होते व दुरावा कायम होता आता वाऱ्याची दिशा बदलली आहे परिस्थिती वेगळी झाली.
राजकारणात कोणीच कायमचा शत्रु वा मित्र नसतो. प्रतापरावांचे स्टार’ बळकट झाले. त्यांनी २०१९ मध्ये अशोकरानांना’ पराभूत करत राज्याचे लक्ष वेधून घेतले. आणि जायंट किलर ठरले. दरम्यान राजकीय पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. आता हे दोन्ही कटर विरोधक असलेले नेते एकाच पक्षात ‘ म्हणजे भाजपात आहेत.” तेरे दिल मे “कमल “का “फुल”…. मेरे दिल में कमल का “”फुल” असे म्हणत २०२४ च्या निवडणूकीसाठी सामोरे जाणार आहेत. १७ वर्षानंतर जिल्ह्याचे दोन्ही मातब्बर नेते एकाच पक्षात एकत्रित आले आहेत. येत्या काळात जिल्ह्याचे राजकीय कसे वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशोकराव व प्रतापराव राजकीय दुरावा बाजूला सारून वीस वर्षांपूर्वी जसे एकच होते तसे आता पुढे राहतील काय (?) राजकीय वाटणी कशी होते (?) एकमेकांवर कुरघोडी करणार (?) की समेट होणार (?) असा अनेक प्रश्नांची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.