नांदेड। रात्रीचे वेळी लिफट देतो म्हणून फिर्यादीस आडरस्त्याला नेवुन त्याचे जवळील मोबाईल व नगदी रुपये लुटनारे दोन आरोपीस मुद्देमालासह नांदेडच्या स्थानीक गुन्हे शाखेने पकडून कारवाई केली आहे.
दिनांक 25/03/2024 रोजी रात्री 02.00 वाजता फिर्यादी हा सौरभ बार मालेगाव रोडने घराकडे पाई जात असतांना त्यास आरोपीने तुम्हास शेतकरी पुतळया जवळ सोडतो म्हणुन मोटार सायकल वर बसवुन शेतकरी पुतळया जवळ नसोडता त्यांने दुसऱ्याच गल्लीत नेले तेथे त्याचे दोन साथीदार दुसऱ्या मोटार सायकलवर आले व तिघानी मिळुन फिर्यादी जवळील मोबाईल व नगदी रुपये जबरीने चोरुन नेले वरुन पो.स्टे. भाग्यनगर येथे गुरन 134/2024 कलम 392,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाच्या आरोपीचे शोध करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांना दिले होते. त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी पोउपनि बिचेवार यांची एक टिम नेमण्यात आली होती. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी गोपनीय माहीतीगार यांचे कडुन माहीती घेवुन आरोपी नामे 1. विजय मोहण भोंगे वय 21 वषे रा. पवननगर भावसार चौक नांदेड, 2. सुमेध गोपाल लांबा वय 19 वर्षे रा. नवजीवन नगर नांदेड यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांचे ताब्यातुन गुन्हयातील गेला माल मोबाईल व नगदी 2000/- रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण
42,000/- रुपयाचा मुद्देमाल त्यांचे कडुन जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, तानाजी येळगे, मोतीराम पवार, महेश बडगु, ज्वालासिंग बावरी, गजानन बयनवाड यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.