नांदेड| ऊसतोडी साठी मजुर पुरवितो म्हणुन फिर्यादीस नांदेडला बोलावून कमी किंमतीत अर्धा किलो सोने देतो म्हणून सांगून दहा लाख रूपये बळजबरीने घेऊन पळणारे आरोपीचा नांदेड पोलिसांनी शोध लावला असून, त्यांच्याकडून एक हिरोहोंडा स्पलेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोस्टे लिंबगाव गुरन 154 / 2023 कलम 395 भादवि प्रमाणे दिनांक रोजी फिर्यादीने पोस्टेला फिर्याद दिली की, यातील आरोपी अर्जुन शिंदे. फिर्यादीचे एक वर्षा पासुन संपर्कात होता. ऊसतोडी साठी मजुर पुरवितो म्हणुन फिर्यादीस नांदेड येते बोलाविले, नांदेड येते आल्यावर कमी किंमतीत अर्धा किलो सोने देतो असे सांगुन फिर्यादीला पोस्टे लिंबगाव हदीतील वरखेड या गावाचे शिवारात बोलावुन सात ते आठ साथीदाराचे मदतीने दहा लाख रूपये बळजबरीने घेवुन पळ काढला होता.
अश्या प्रकारच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयात आरोपीना नांदेड पोलिसांच्या टीमला निष्पन्न करण्यात यश आले आहे. यामधील आरोपित अर्जुन शिंदे, रा. ता. उमरी, राहुल पवार, रा. मुदखेड,अनिल मारकुळे, रा. वसमत, सुरेश पवार, रा. वसमत, पिया गोरे, किशन गोरे, लखन एरंडले, सोन्या काळे, इत्यादीचा नावांचा समावेश आहे. सदर गुन्हयात अनिल रंगनाथ मारकुळे, रा. वसमत यास अटक करण्यात आली असुन, त्यांचेकडुन गुन्हयातील रक्कमेतून खरेदी केलेली एक हिरोहोंडा स्पलेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.