हिमायतनगर| जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकांच्या गैरवर्तणुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन चांगला शिक्षक देण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देऊनही गटशिक्षण विभागाने दखल घेतली नसल्याने हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी गावातील शालेय व्यसवस्थापन समिती व शिक्षणप्रेमी पालकांनी कुलूप लावले आहे. त्यामुळे आज येथील विद्यार्थ्यांची शाळा वर्गखोलीबाहेर भरविण्यात अली आहे. येत्या दोन दिवसात शिक्षक न दिल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. हा प्रकार शाळा तपासणी पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर पथकाच्या प्रमुखाने सबंधितांना कडक सूचना देऊन शाळेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्याचे सांगितले. दिवाळीनंतर शाळांना सुरुवात झाली, मात्र हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी हजेरी लावली. मात्र दुसऱ्या दिवशीपासून भोकरहून ये जा करणाऱ्या शिक्षकाने शाळेला दांडी मारली आहे. सादर शिक्षक हा नेहमी मद्यपान करून येतो असल्याने विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर विपरीत परिणाम होऊन शाळेची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
करंजी येथील जिल्हा परिषद शाळेला मंजूर शिक्षक २ असून, एका शिक्षकाची वर्तणूक बरोबर नाही. त्यामुळे येथील शिक्षक बदलवून देऊन विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणारा शिक्षक देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र प्रमुखांनी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकांच्या बदलीची ऑर्डर काढली. मात्र अजूनही त्या शिक्षकाची येथेच नेमणूक असल्याने त्या शिक्षकाच्या गैरवर्तणुकीमुळे शाळेवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्याऐवजी गुणवत्ता घटत चालली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शशिक्षणिक नुकसान लक्षात घेऊन शालेय यवस्थापन समितीचे अध्यक्ष अहमद हुसेनखान पठाण, उपाध्यक्ष गजानन सुभाष शिंदे, माजी उपाध्यक्ष गजानन भगवान जाधव, उपसरपंच शब्बीरखान पठाण, अशोक जाधव, साईनाथ शिंदे, बाबुराव मिराशे, दारेखा पठाण यांच्यासह इतर पालक वर्गणी संतप्त होऊन शाळेला कुलूप ठोकले आहे.
जर येत्या दोन दिवसात चांगला शिक्षक मिळाला नाही तर शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षणप्रेमी पालक वराह आमरण उपोषणाला बसणार आहे. याबाबत गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी याना लेखी अर्ज देऊनही याची दाखल घेली नसल्याने शालेला कुलूप लावले असल्याचे पालकणी सांगितले आहे. किमान आत्तातरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शिक्षणविभाग ठोस पाऊले उचलून शिक्षक उपलब्ध करून देईल का याकडे शिक्षणप्रेमी पालकांचे लक्ष लागले आहे.