क्राईमनांदेड

हदगाव येथील तरुणांची नायगाव तालुक्यातील देगाव जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

नायगाव,रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मौजे देगाव येथील गावा लगत जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला तुकाराम मोरे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळ्यातील दस्तीने गळफास घेऊन तरुण युवकांनी आत्महत्या केली आहे.

सदरील घटना 26 आॅक्टोबर च्या रात्री घडली असून 27 आॅक्टोबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. घटना समजताच कुंटूर पोलीस घटना स्थळी दाखल झाली. सदरील आत्महत्या केलेला युवक विक्रम प्रकाश रावुलवार वय वर्षे 25 व्यवसाय मजुरी रा. वडगाव ता हदगाव येथील आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या माहिती नुसार सदरील तरुण हा देगाव येथील बहिणीच्या घरी आला होता. तो नेहमी दारुचा नशेत राहत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सदरील तरुणाचे लग्न झालेले नाही. तो काही दिवसापासून नायगाव येथे हाँटेलमध्ये राहुन काम करत होता अन दारु पिऊन मिळेल ते काम करत होता असा त्याचा स्वभाव असल्याची माहिती फिर्यादी मयताचे वडील प्रकाश किशन रावुलवार यांनी कुंटुर पोलीस ठाण्यात येऊन दिली आहे. कुंटुर पोलिसांनी मृत व्यक्तीचे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!