नांदेडसोशल वर्क

सायबर सेल पोलीस स्टेशन नांदेड यांचे सहाय्याने एकुण 11 मोबाईल शोध घेवुन तक्रारदार यांना परत दिले

नांदेड। जिल्ह्यातील किनवट पो.स्टे. हद्दीतील सायबर सेल पोलीस स्टेशन नांदेड यांचे सहाय्याने एकुण 11 मोबाईल शोध घेवुन तक्रारदार यांना परत देण्यात आले.

पोलीस स्टेशन किनवट हद्दीतील सार्वजनिक ठिकाणातुन आठवडी बाजारातुन महागडे मोबाईल गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक भोकर यांनी आदेशित केले होते. त्यानुसर पो.स्टे किनवट चे पथक करुन सायबर सेलच्यामदतीने मिसिंग मोबाईलची शोध घेण्याची मोहिम राबविण्यात आली होती.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणेसाहेब, पो.नि. बिर्ला साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन किनवट पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.काँ. 1913 राठोड, नापोकॉ 1954 संग्राम व पो.कॉ. 2924 पठाण यांच्या व सायबर सेलच्या मदतीने गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावुन एकुण 11 मोबाईल किंमती अंदाजे 2,15,000/- रु चा माल हस्तगत केले आहे. सदरील मोबाईल आज रोजी पो.स्टे. किनवट येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणेसाहेब, पो.नि. बिर्ला साहेब यांचे हस्ते सदरील मोबाईल फिर्यादीकडे परत करण्यात आले आहे.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणेसाहेब, पो.नि बिर्ला साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन किनवट पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.काँ. 1913 राठोड, नापोकाँ 1954 संग्राम व पो.कॉ. 2924 पठाण यांची सदरची गहाळ मोबाईल शोध मोहीम राबवुन पार पाडली आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!