नाली बांधकाम भिषण दुर्घटना…नाली बांधकामाची भिंत कोसळून एक ठार ; दोन गंभीर

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। वाई बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या नाली बांधकाम करतांना नालीची भिंत कोसळून त्याखाली दबल्या गेल्याने एकाचा मृत्यू, एक अत्यवस्थ तर एकजण गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
दि. ३ आक्टो, रोजी वाई बाजार येथे सकाळी साडे अकराच्या सुमारास येथील ग्राम पंचायतीकडून सुरू असलेल्या नाली बांधकामावर मजूरांसह मिस्त्री नाली बांधकाम काम करीत होते.
बाजूला जेसीबी ने लेवलींगचे काम सुरू होते , कच्ची असलेल्या भिंतीच्या काठावर जेसीबी आल्याने संपुर्ण जेसीबीचा भार त्या कच्च्या भिंतीवर पडला.. त्यामुळे नालीत सेन्ट्रीग खोलत असलेल्या मंजुरावर एकेरी भिंत कोसळली त्यामध्ये संजय किशन मडावी वय ४२ वर्षे, शुभम भिमराव पेंदोर वय २५, व सुमित सिताराम मरापे वय १९ तिघेही रा. कोलामखेडा वाई बाजार ता. माहूर ह्या तिघांना बाहेर पडता न आल्याने तिघेही त्या भिंतीखाली दाबल्या गेेेले..
अथक प्रयत्नानंतर तिघांनाही बाहेर काढण्यात यश आले. संजय किशन मडावी व शुभम भिमराव पेंदोर यांना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात आनले असता वैघकिय अधिकारी डॉ. व्हि.एन. भोसले , डॉ मोहन.अकोले यांनी जखमी वर उपचार केला असता संजय किशन मडावी वय ४२ यास मृत घोषित केले. तर सुमित व शुभम भिमराव पेंदोर याची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने दोन्ही जखमींना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे पाठवण्यात आले केले आहे.
