
हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर यात्रेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन दिनांक 20 मार्च रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेला रात्री दहा वाजता माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. रात्रभर चाललेल्या या भजन स्पर्धेत एकूण 11 स्पर्धकांनी सहभाग घेऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्री परमेश्वर यात्रेतील भजन स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसनी येथील साधुलीला भजनी मंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
या स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसनी येथील साधुलीला भजन मंडळाच्या चिमुकल्यानी एकापेक्षा एक सरस असे भक्तीगीत सादर करून प्रथम क्रमांकाचे 31 हजार रुपयांच्या बक्षीसाचे मानकरी ठरलं आहेत. तर उदगीर येथील संत सूरदास भजन मंडळांनी द्वितीय क्रमांक मिळविला असून, त्यांना 15 हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले आहे. तर नादब्रह्म संगीत विद्यालय नांदेड येथील भजन मंडळ तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले असून, त्यांना 7500 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. गुरुदेव सेवा मंडळ आर्णी या संगीत संचाला चौथ्या क्रमांकाच 5000 रुपयाचं बक्षीस देण्यात आले आहे. तर पाचव्या क्रमांकाचे 3000 रुपयांचे पारितोषिक हिमायतनगर येथील श्री परमेश्वर भजनी मंडळास देण्यात आले आहे. तसेच शिवशक्ती भजन मंडळ हिमायतनगर, साईनाथ भजन मंडळ कार्ला, माऊली भजन मंडळ, कृष्णापुर, बसवेश्वर भजन मंडळ येवली, स्वरांजली संगीत भजन मंडळी, उमरखेड, अप्पादेव भजन मंडळ, चातारी, यांना प्रोत्साहनपर बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या भजन स्पर्धेचं परीक्षण करण्याचं काम नांदेड येथील रमाकांत जोशी आणि सुशांत पांडे यांनी पाहिले.
यावेळी याप्रसंगी मंचावर श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक लताबाई मुलंगे, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, विठ्ठल ठाकरे, संतोष गाजेवार, रामभाऊ सूर्यवंशी, मुन्ना शिंदे, मारोती विक्रम शिंदे, मारोतराव हेंद्रे, दिनकर मुत्तलवाड, अडबलवाड सर, राम नरवाडे, संतोष वानखेडे, गजानन पाळजकर, पापा पार्डीकर, आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सुरेख असं सूत्रसंचालन गोविंद शिंदे यांनी केले.
