धर्म-अध्यात्मनांदेड
श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठानिमित्त दीप नगरमध्ये शोभायात्रा
नांदेड| आयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त दिपनगर हनुमान मंदिराच्या वतीने आज शोभायात्रा काढण्यात आली.
श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त दीपनगर येथील हनुमान मंदिर आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 8 वाजता टाळ, मृदंग व ढोल-ताशाच्या गजरात दीपनगर, ज्ञानेश्वर नगर, बँक कॉलनी, नंदकिशोर नगर परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर भव्य अशी महाआरती करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहनसिंह तौर, भाजपा महानगर चिटणीस क्षितिज जाधव, शिवसेना शहरप्रमुख उमेश दिघे, शरद सोडेगावकर, चंद्रकांत देगावकर, रामराव भोसले, मुकुंद धानोरकर, नामदेव केंद्रे, चंदू तिडके, देविदास भोपळे, बोधनकर, कदम यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.