राम जन्मभूमी अयोध्यावरून येणाऱ्या अक्षदाचे वाटपा संदर्भात बैठकीचे 27 नोव्हेंबर रोजी नरसी येथे आयोजन
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। बऱ्याच दिवसापासून आपल्या पूर्वजांची इच्छा होती अयोध्येत राम मंदिर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी अनेक जणांनी संघर्ष केला, अनेक जणांनी कोर्टात लढे लढले ,शेवटी मंदिराचा निर्णय लागला. त्याच्या उभारणीसाठी राम मंदिर निधी संकलन म्हणून आपल्या प्रत्येकाचे योगदान त्यात आहे. आपण सर्वांनी मिळून निधी दिलात जमा केलात आणि आता राम मंदिर उभे राहिले आहे.
22 जानेवारी 204 रोजी आयोध्येमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा स्थापना आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे.त्या दिनानिमित्त नायगाव तालुक्यातील प्रत्येक घरी आयोध्येवरून येणारे अक्षदा पोहोचवायचे आहेत. त्या साठी तालुक्यात एक समिती तयार करायची आहे. त्या समितीचे नाव लोकोत्सव समिती नायगाव तालुका असं दयायच आहे.उत्सवाची पूर्व तयारी संदर्भात बैठक दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत बालाजी मंदिर नरसी येथे आयोजन करण्यात आले आहे.
लोकोत्सव समितीचा उद्देश प्रत्येक घरा पर्यंत आयोध्येवरून येणाऱ्या अक्षदा पोचवणे. प्रत्येक गावातील प्रत्येक घरा पर्यंत अक्षदा पोच करण्यासाठी तालुक्यातील साधु संत मंडळी, स्वामी समर्थ भक्त, नरेंद्र महाराजभक्त,स्वाध्याय परिवार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,, श्री श्री रविशंकर , आसाराम बापू भक्तगण,भजनी मंडळ,दुर्गा मंडळ, गणेश उत्सव मंडळ,वारकरी संप्रदाय,विविध जयंती मंडळ,गावात सप्ता करणारी मंडळी,व असे प्रभू श्री रामांना मानणारा वर्ग यांना या समिती मध्ये सामावून घायच आहे.
लोकोत्सव समिती मध्ये सामील होऊन घरा घरा पर्यंत अक्षदा देऊन निमंत्रण द्यायचे आहे तरी आपण समिती मध्ये सामील होऊन आपला आनंद व उत्साह वाढवावा. नायगाव तालुका लोकोत्सव समितीत सामील व्हावे असे आव्हान लोकत्सव समितीचे गणेश पाटील कंदूरके.रामप्रसाद चन्नावार . अनिल सावकार शीरमवार, राजेशवर बुधवाड, मन्मत कस्तुरे नायगाव तालुका यांनी केले आहे.