नांदेड| एक 63 वर्षीय वाशिम जिल्हयातील ज्येष्ठ नागरिक सुवर्ण कारागीर हे त्यांच्या 60 वर्षीय पत्नीसह नांदेड शहरामध्ये त्यांच्या खाजगी कामासाठी दि. 04/12/2023 रोजी सकाळी आले होते व आपले काम आटोपुन ते रात्री 10.00 वा. चे सुमारास नांदेडहुन वाशिमसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाण्यासाठी सिटी बस स्टैंड ते मध्यवर्ती बस स्टैंड दरम्यान एक अॅटो क्रं. MH-26 N-5625 या अॅटोने जात असताना, त्या अॅटोमध्ये अगोदरच दोन प्रवाशी समोरील बाजुस दोन व मागील बाजुस एक असे प्रवाशी बसलेले असताना सदर 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या 60 वर्षीय पत्नी यांना बसवुन मध्यवर्ती बस स्टँडच्या दिशेने जात असताना मध्येच अॅटो थांबवून अॅटोमधील चालक व त्याचेसोबत असणारे इतर 03 आरोपींनी 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या 60 वर्षीय पत्नी यांना खाली उत्तरवुन त्यांना शिवीगाळ करुन दम देवुन व जिवे मारण्याची धमकी देवुन त्यांचे खिशातील 13,000/- रुपये व एटीएम कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड असे त्यांचे पैशाचे पॅकेट जबरीने काढुन घेवुन पळुन गेले होते अशा वर्णनाच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड येथे गु.र.न..555/2023 क.392,34 भादवि हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मा. अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज गुरव यांनी सदर प्रकरणामध्ये आरोपी निष्पन्न करुन तात्काळ अटक करणेबाबत पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड यांना आदेश असता त्यांनी पोलीस स्टेशन वजिराबाद, नांदेडच्या डिबी पथकास योग्य मार्गदर्शन करुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना केल्या असता पोलीस स्टेशन वजिराबाद चे डिबी पथकातील पोलीस अमंलदार पोहेकॉ/2083 दत्तराम जाधव, पोहेकॉ/2085 विजयकुमार नंदे, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/2616 अरुण साखरे, पोकॉ/2896 शेख इमरान, पोकॉ/3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/14 भाऊसाहेब राठोड यांनी पो.स्टे. हददीतील आपले गोपनीय बातमीदारांकडील उपलब्ध माहिती आधारे नांदेड शहरामध्ये शोध घेवुन बस स्टैंड परिसरामध्ये आरोपी नामे 1. शेख हाजी शेख खालेद, वय 32 वर्ष, व्य. मजुरी, रा. नई आबादी, नांदेड 2. मंगेश नारायण सोनकांबळे, वय 30 वर्ष, व्य, मजुरी, रा. आंबेडकर नगर, नांदेड. 3. शेख बाबु शेख फरीद, वय 43 वर्ष, व्य. मजुरी, रा. नई आबादी, नांदेड. 4. शेख वसीम ऊर्फ लंगडा शेख सत्तार, वय 27 वर्ष, व्य. मजुरी, रा. नई आबादी, नांदेड असे आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध इ ाल्यावरुन त्यांचा शोध घेवुन गुन्हयामध्ये वापरलेला अॅटो क्रं. MH-26 N-5625 हा ताब्यात घेवुन सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
सदर गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री. प्रविण आगलावे यांचे ताब्यात दिले व आज रोजी सदर आरोपींना मा. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय नांदेड यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींची 05 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मा. न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणुन श्रीमती ‘एस.बी. जोहिरे मॅडम यांनी कामकाज पाहिले. सदर प्रकरणामध्ये कामकाज करणारे पोलीस स्टेशन वजिराबाद येथील सर्व पोलीस अधिकारी, अमलदार व सरकारी वकील यांचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.