मानवता जपणारा डॉक्टर… तेलंगणा प्रशासनावर कडाडत खासदार गोपछडे म्हणाले, मयत कंधारे, मेरा भाई है
नांदेड, गोविंद मुंडकर। बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माधवराव पाटील कंधारे यांचे उपचारादरम्यान हैदराबाद येथे निधन झाले. अपघाताची पार्श्वभूमी असल्यामुळे शवविच्छेदन आवश्यक असल्याचे प्रगट करण्यात आले. यासाठी शवविच्छेदन करण्यासाठी तब्बल दोन तास थांबवण्यात आले.यावेळी राज्यसभा सदस्य डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले की वह मेरा भाई है ऐसा समज कर तुरंत अगली कारवाई की जाये.
बिलोली आणि नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माधवराव पाटील कंधारे यांना छोटासा अपघातात दुखापत झाल्याने उपचारार्थ नांदेड दाखल केले होते. त्यानंतर वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार तसेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सांगण्यानुसार हैदराबाद येथे दाखल करण्यात आले. अनेक दिवस उपचार झाल्यानंतर आज 17 जून 2024 रोजी पहाटे त्यांना मृत घोषित करण्यात आले. संपूर्ण कंधारे परिवार शोक सागरात बुडालेला असताना, प्रशासकीय औपचारिकतेसाठी प्रचंड अनास्था आणि दिरंगाईचा सामना करावा लागत होता. हे बाब मयत कंधारे यांच्या नातेवाईक यांच्याकडून कळाली. डॉक्टर गोपछडे यांनी पीडित कुटुंब आणि प्रशासकीय अधिकारी समन्वय घडवून आणला.
डॉक्टर अजित यांनी कायदेशीर आणि संवेदनशील बाब लक्षात घेऊन कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचा सल्ला कंधारे परिवार आणि त्यांच्या मित्रांना देत असतानाच प्रशासनातील अधिकाऱ्यांना अनास्था आणि प्रचंड दिरंगाई याबाबत खडा सवाल करत माधवराव कंधारे माझे बंधू आहेत अशा पद्धतीने प्रकरण हाताळण्यात यावे.अन्यथा मला यथायोग्य पाऊल उचलावे लागेल. डॉक्टर अजित गोपछडे यांच्या या विधानानंतर शवविच्छेदन प्रक्रिया त्वरित पूर्ण करून वैद्यकीय प्रशासनाने तातडीने कंधारे परिवारास शव सुपूर्द केले. डॉक्टरांची कृती मानवता जपणारी असल्याची चर्चा नायगाव आणि बिलोली परिसरात होती.