भोकर, गंगाधर पडवळे | भोकर-किनवट रस्त्यावरील व भोकर शहरापासून जवळच असलेल्या सुधा प्रकल्पातील जुन्या पुलाजवळील पाण्यात हात पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेतील एका तरुणाचा मृतदेह दि.११ डिसेंबर रोजी दुपारी सापडला असून भोकर पोलीसांना अद्याप तरी त्या मयत तरुणांची ओळख पटली नसून ओळख पटविण्यासाठी मृतदेह स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या शवागृहात ठेवण्यात येणार आहे.तसेच सदरील अनोळखी तरुणाच्या घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने ओळख पटल्यानंतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल व त्याच दिशेने तपास होईल असे भोकर पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की दि.११डिसेंबर २०२३ रोजी सकाळी नेहमी प्रमाणे भोकर येथील सुधा नदीच्या जुन्या पुलाजवळ थेरबानच्या बाजूने मच्छीमार मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांना तेथे एक दोरी पाण्यावर तरंगताना दिसली त्यांनी ती दोरी कशाची आहे हे पाहणयासाठी तिला ओढून पाहिले असता त्या दोरीला बांधून मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली तेंव्हा त्यांनी समाज सेवक संदीप पाटील गौड यांना वरील सर्व माहिती सांगितली लगेच संदीप पाटील गौड यांनी भोकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना याविषयी माहिती दिली.
यावरून पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, पोहेका भीमराव जाधव,पोका,जी.एन.आरेवार, विकास राठोड,पोलीस चालक मंगेश क्षीरसागर आदींनी २:१५ च्या दरम्यान घटना स्थळी धाव घेत स्थानिक मच्छीमार,नगरपरिषदेचे सफाई कामगार यांच्या मदतीने प्रेतास पाण्याबाहेर काढून पंचनामा केला .त्यानंतर शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणण्यात आले तर प्रेत हे अनोळखी असल्यामुळे नांदेड येथील स्व.डॉ शंकरराव चव्हाण महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्या मृतदेहाच्या अंगावर काळ्या रंगाचा कोट थंडी पासून बचाव करण्याकरिता असतो तो असून आत पिवळ्या रंगाचा टीशर्ट, निळ्या रंगाची जीन्स पँट असून हातावर टॅटू ने अनेक नावे गोंदलेले अढळून आले त्यात प्रामुख्याने इतर भाषेतील भाषांतर केल्यावर समजले किते नाव आई अस आहे तर एका हाताच्या मनगटावर इंग्रजीत नरेश असे आहे व दुसऱ्या हातावर सनी,सिंधू,असून बाजूला तीन चांदण्या ही आहेत.अन्य एका जागी प्रिया व एक नाव खोडलेल फिकट दिसत आहे. सदरील प्रेताचे दोन्ही हात,पाय बांधून असल्याने हे आत्महत्या नसून काहीतरी घातपात असल्याची शंका, पाहणारे व पोलीसही करीत आहेत.तरी सदरील वर्णनाचा व्यक्ती कोणाच्या ओळखीचा वाटला तर त्वरित भोकर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.