कृषीनांदेड

खरीप हंगामात शेतकरी, विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापित

नांदेड। महाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापुर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खरिप हंगाम-2024 च्या आढावा सभेत बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापुर्ण उपलब्धतेबाबत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

सदर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्काचा व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता ) 9822446655 उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेल वर सुद्धा पाठवता, नोंदवता येईल.

संबंधीतांनी, उपरोक्त नमुद व्हॉट्सॲप क्रमांक (9822446655), टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक (18002334000) तसेच ई-मेलवर (controlroom.qc.maharashtra@gmail.com) येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत. साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा. सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास सुध्दा आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.

शेतक-यांच्या सुविधेसाठी एक भ्रमणध्वणी, एक टोल फ्री क्रमांक व एक ईमेल तक्रार निवारणासाठी समर्पीत केलेले असुन त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी 1 जुन ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत नोंदवण्याबाबत आवाहन कृषि आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!