श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालूक्यातील मौजे रूई येथे ३०० ब्रास मूरुम उत्खननाची परवानगी असताना हजारो ब्रास मूरुमाचे उत्खनन केले गेले या प्रकरणी ईलीयास बावाणी यांनी तहसीलदार माहूर यांच्या कडे लेखी तक्रार केली व ईटियस (रोव्हर) मोजणीची मागणी केली होती अखेर दि १० सप्टेंबर रोजी भूमिअभिलेख कार्यालय कडून मोजणी करण्यात आल्याने नेमका किती ब्रास मुरूम जास्तीचा काढून नेण्यात आला हे स्पष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड ह्यांनी महाखनीज प्रनालीवर गौण खनिज उत्खनन व वाहतूक करीता अर्ज करून मौजे रूई,ता,माहूर येथील स.न./ ग.न. ५७ या मधील २.२० हे. आर क्षेत्रावर ३०० ब्रास मूरुम, या गौण खानिज्याच्या उत्खनना करीता एकून रक्कम २०६४७६.०० रु,भरून दि,३१ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत परवानगी घेतली दोन टू टेन आणि जेसीबी तसेच दहा ते बारा हायवाच्या साह्याने दिवस रात्र वाहतूक करून उत्खनन केले होते.

मंजूर ३०० ब्रास पेक्षा अधिक उत्खनन झाल्याने ईलीयास बावाणी राज ठाकूर यांनी दि,४ ऑगस्ट रोजी तक्रार देउन ईटिएस रोव्हर मोजणीची मागणी केली होती या प्रकरणी तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दि ७ ऑगस्ट रोजी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माहूर यांना किती ब्रास मूरुम उत्खनन झाले मोजणी करुन अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते, या प्रकरणी आज दि,१० रोजी घटनास्थळावर भूमापक एम. जी. मरशिवने,प.भू. माधव कदम यांनी मोजणी केली. यावेळी तलाठी शितल ढाकूलवार (राऊत), सह पंच उपस्थित होते.

किती ब्रास मुरूमाचे उत्खनन आले तसा अहवाल अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माहूर कडून येत्या दोन ते तीन दिवसात सादर होणार असून या मोजणी च्या अहवालाकडे तालुक्यातील जाणकार सह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
