नांदेड| लोहा येथील एका पदाधिकाऱ्याने राजकीय वजनाचा गैरवापर करत आपल्या स्वतःच्या जागेत हरिण या प्राण्यांचे पालन केले होते. सदरील व्यक्ती संगोपन करीत असलेले हरिण हे मृत झाले होते. या मृत हरिणांचे काय केले? याची सविस्तर चौकशी व्हावी अशी तक्रार दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी वनविभाग नांदेड कार्यालयास संभाजी पवळे नामक व्यक्तीने दिली आहे.
देशात/राज्यात वन विभाग कायद्यानुसार हरीण नामक प्राण्यांचे पालन/संगोपन करणे हा गंभीर गुन्हा असल्याने हा व्यक्ती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसमवेत माझे संबंध असल्याचे लोहा येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगत गैरप्रकार करत असतो. आणि भाजपा पक्ष सत्तेत असल्याने लोहा येथील त्या व्यक्तीला सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा वरदहस्त आहे का..?
की परभणी, पुणे ,मुंबई येथून वरिष्ठ भाजपा पदाधिकऱ्यांचे त्यास बळ मिळते आहे का..? याचा देखील तपास वन विभागाने केला पाहिजे. तसेच सदरील प्रकरण हे वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला माहिती होते असेहि दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. सदरील प्रकरणात अनेकजण दोषी आढळण्याची दाट शक्यता वाटते असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. यांची सविस्तर चौकशी होऊन दोषींवर वन्य प्राणी संरक्षण कायदयानुसार कार्यवाही करावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.