नांदेड| विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी हरवलेल्या बेपत्ता महिला संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार ” ऑपरेशन मुस्कान 12 ही शोध मोहिम दिनांक 01/11/2023 ते 30/11/2023 या कालावधीत राबविण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.
ऑपरेशन मुस्कान -12 अतंर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन/ विभागानी हरवलेल्या/ बेपत्ता महिला (18 वर्षावरील) व बालकांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर 01 शोध पथक तयार करुन हरवलेल्या/ बेपत्ता महिला व बालकांचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या आहेत. तसेच अपर पोलीस नांदेड अबिनाशकुमार सर, धरणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांनी दररोज शोध पथकाचे कामगीरीचा आढावा घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तसेच अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक श्री भंडरवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रियंका आर. आघाव, पोलीस जमादार अच्युत मोरे, किशन चिंतोरे, सायलु बिरमवार, गणेश जाधव, यशोदा केंद्रे यांच्या पथकामार्फत हरवलेल्या महिलांचा व बालकांचा शोध घेवुन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मोहिमे दरम्यान आठवडयातून एक दिवस उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी पथकाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करावे या बाबतही सुचना देण्यात आल्या आहेत.