आयुष्यमान भारत प्रमाणपत्रासाठी तथा शिबीरास येताना ज्येष्ठ नागरिकांनी आधारकार्ड, रॅशनकार्ड व मोबाईल फोन आणने गरजेचे-डॉ.हंसराज वैद्य
नांदेड| येत्या 5 नोव्हेंबर रविवारी होऊ घातलेल्या संधीवात, दमा (अलर्जी), मुतखडा विनामुल्य निदान व उपचार शिबीर तथा सेवानिवृत वृंद व ज्येष्ठ महिला-पुरूष नागरिकासाठीच्या “आयुष्यमान भारत प्रमाणपत्र” वाटप कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून, शिबिराचे उद्घाटन सकाळी 11 वाजता वैद्य रूग्णालय परिसरात मा.शिवानंदजी मिनगीरे साहेब (सामाज कल्यान विभागाचे सहआयुक्त) यांच्या हस्ते तर मा.बापू दासरी (समाज कल्याण अधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शिबीरात गुफिक हेल्थ केयर, मेडले फार्मास्युटिकल्स तथा अनेक मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. शिबिरात हाडाचा ठिसूळपणा, शूगर तपासण्या आदि विनामुल्य करण्यात येऊन सल्यासह औषधीही दिली जाणार आहेत. शिबिरास मा.शिवानंदजी मिनगीरे साहेबांचे एकमेव विशेष मार्गदर्शन राहणार आहे. तसेच बँक ठेवी का? केव्हा? कशा करावयाच्या याबद्दलही तज्ञांकरवी संक्षिप्त विशेष माहिती शिबीरार्थींना मिळणार आहे. तरी सर्वच शिबिरार्थींनी येताना आपापले आधार कार्ड, रेशन कार्ड व ओ.टी.पी.साठी मोबाईल फोन आपल्या बरोबर आणावेत व वेळेवर उपस्थित राहून या संधीचा फायदा तथा लाभ घ्यावा, असे आवाहान आयोजक डॉ.हंसराज वैद्य, गिरिष सुभाषजी बार्हाळे, भुताळे व प्रभाकर कुंटूरकर आदिंनी केले आहे.