हिमायतनगरातील आंदेगावच्या स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभाराच्या विरोधात रेशनधारक लाभार्थी धडकले तहसीलवर
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे आंदेगाव पूर्व येथील रेषाकारधारक लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यापासून येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून रेशनचे वितरण झाले नाही. त्यामुळे येथील लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालय गाठत निवेदन देऊन मनमानी कारभार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे. जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यापासून धान्य न देणाऱ्या दुकानदारावर कार्यवाही झाली नाहीतर लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार डी.एन.गायकवाड याना निवेदनातून दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. सध्या तालुक्यातील मौजे आंदेगाव पूर्व येथील नागरिकांना जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानदार यांनी शासनाकडून उपलब्ध होणारे धान्य वितरित केले नाही. त्यामुळे दुकानदाराने गोरगरिबांच्या धान्याची काळ्या बाजारात विल्हेवाट तर लावली नाही ना…? अशी शंका व्यक्त करत येथील रेशनकारधारक लाभार्थीं यांनी दि.30 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर येथील तहसीलदार कार्यालय गटातून रेषांची मागणी लावून धरली आहे.
तहसीलदारांना या मागणीचे निवेदन देऊन दिवाळीपूर्वी येथील गोरगरीब नागरिकांना रखडलेल्या मागील तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच वेल्वार धान्य वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या त्या स्वस्त धान्य दुकानदारावर पुरवठा अधिकाऱ्यांची मेहेरनजर आहे का..? असा सवाल उपस्थित करत गोरगरीब जनतेला हक्काच्या रेषणपासून वंचित ठेवल्याप्रकरणी संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करून रेषणकार्ड लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देण्याची हमी देण्यात यावी, तोपर्यंत मागील तीन महिन्याचे रेशन दिले जात नाही तोपर्यंत पुढील महिन्याचे रेशन लाभार्थीं घेणार नाहीत असा निर्धार दिलेल्या निवेदनातून केला आहे.
हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या रेशन वितरणाच्या या आलबेल कारभाराची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी करून गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काचे रेशन मिळवून द्यावे. अशी मागणी तक्रारदार उत्तम राऊत, रमेश कालेवाड, मारोती येलकेवाड, अशोकराव सुबनवाड ,रुपेश नाईक, बालाजी भुसावळे ,मारोती मॅकलवाड, बालाजी सुबनवाड ,संतोष खिल्लारे, लखन काळबांडे, माजिद पठाण ,दत्ता मुतनेपाड ,दिगंबर दारेवाड, अहमद पठाण, गणेश मॅकलवाड ,बाबुराव अक्कलवाड, प्रकाश येलकेवाड, राजाराम धनसरवाड, सातवजी बिल्लेवाड, शंकर सुब्बनवाड, रामजी यम्मलवाड यांच्यासह असंख्य रेशनकार्ड धारक लाभार्थी महिला पुरुषांनि केली आहे.
या रेशन दुकानदार विरोधात मागील काही महिण्यापुर्वी या गावातील नागरिकांनी तक्रार देऊन चौकःसीची मागणी केली होती. मात्र अद्यापही मागणीची चौकशी झाली नाही…. जर झाली असेल तर चौकशीचा अहवाल तक्रारदारांना देण्यात आला नाही. आणि रेशन वितरण केला असल्याचा देखील खुलासा अथवा धान्य वितरण केल्याची सत्यप्रत देखील दुकानदाराने अथवा चौकशी अधिकाऱ्यांनी दिला नाही. त्यामुळे या प्रकरणःची चौकशी का केली नाही..गोरगरीब लाभार्थ्यांच्या धान्याची तीन महिन्याची रिकव्हरी का..? दिली नाही असं सवालही येथील लाभार्थीं नागरिकांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.