नांदेडलाईफस्टाईल

शासनाने मराठा समाजाला तात्काळ सरसकट आरक्षण द्यावे व अंमलात आणावे-डॉ.हंसराज वैद्य

नांदेड| मा. संतोश पुरी महाराज हे नांदेड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मा.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून अमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या तब्येतीची चौकशी करून संपूर्ण समर्थन देताना डॉ.हंसराज वैद्य, डॉ.प्रा.हनुमंत भोपाळे व समाज बांधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. शासनाने विलंब न लावता त्वरित विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी डॉ.हंसराज वैद्य यांनी केली आहे.

केंद्र व राज्य शासनानेही घटणेचा आधार घेऊन कुठल्याही समाज बांधवांच्या आरक्षणाला क्षति तथा धक्का न लागू देता मराठा समाजाला सरसकट आरक्षण कसे देता येईल ते त्वरित पहावे. केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये! मराठा समाज हा मुळातच फूले, शाहू, आंबेडकर, छ.शिवाजी महाराज तथा जाणता राजा यशवंतरावजी चव्हाण यांच्या आदर्श आचार, विचार आणि व्यवहार संस्कृतीस मानणारा समाज आहे. भारतातील व त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील बहूतांश शेतकरी, कष्टकरी, व कुणबिक करणारा हा “मराठा समाजङ्खङ्ख आहे. तो मानवच नाही तर समस्त जिवांचा पोषिंदा आहे. तो न्याय प्रिय, हिष्णू आणि सहन शीलही आहे. या समाजाला आता बेडर, खंबीर, निःस्पृ, निश्चल, निश्वार्थी तथा समाजा भिमूख मार्गदर्शक नेता मा.मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाणे मिळाला आहे.

मराठा समाज आता जागृत होत आहे. काही अंशी झालाही आहे. जगाचा पोशिंदा असूनहि तो कुटूंबासह उपासमारीच्या अर्थात क्रांतीच्या उंबर्ठ्यावर ऊभा आहे. मराठा समाजाने आता अन्याय सहन शीलतेची परिसीमा गाठली आहे. महाराष्ट्रातील “सकल मराठाङ्खङ्ख तिथून “कुणबीचङ्खङ्ख आहे. कारण मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजात रोटी बेटीचे व्यवहार सध्याही प्रचलित असतांना काही मराठा समाजातील लोकांना “कुणबी मराठाङ्खङ्ख म्हणून आरक्षण सवलती मिळतात तर काहीना मिळत नाहित.

हा त्यांच्यावर अनेक वर्षापासून होत असलेला अन्यायच आहे व त्यांनी आजपर्यंत सहन केलेला आहे. तो आता उघडा झालेला आहे. अल्पभूधारक झाला आहे. आतापर्यंत मराठा समाजाचे एक प्रकारे शोषणच झालेले आहे. तो समाज दुसऱ्याचे मिळत असलेले आरक्षण काढून आम्हाला द्या असे म्हणत नाही. तो इतर मराठा समाजाला जसा “कुणबी मराठाङ्खङ्ख म्हणून आरक्षणाचा लाभ मिळतो तसा आम्हालाही मिळाला पाहिजे, तो मिळावा असे गेली चार दशकापासून मागतो आहे. वास्तव न्याय मागतो आहे.

सगळाच मराठा समाज कुणबीच आहे. शासन आता “कुणबी मराठाङ्खङ्ख म्हणून पुरावे मागत आहे. शासन त्यासाठी पस्तीस ते चाळीस वर्षानंतरही पुरावे व वेळ मागत आहे हे हस्यास्पद आहे. म्हणून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या न्याय मागणीला सर्वच समाजातून, सर्व स्थरातून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज दुसर्या वेळेसचा सहावा दिवस असून प्रकृती दिवसेंदिवस ढासाळत चालली आहे.त्यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून अनेक तरूणांनी आत्महत्तेचा मार्ग पत्करला आहे.

अनेक लोक प्रतिनिधिंना आंदोलन कर्त्यानी गावबंधी केलेली आहे. त्यांच्या वाहनांची नासधूस, कार्यालये व घरांना लक्ष्य केले जात आहे. करण्यात येत आहे. रास्ता रोका अंदोलने होत आहेत. लोक प्रतिनिधींचे राजीनामे मागत आहेत व राजनामे देण्यास भाग पाडत आहेत. जरांगे पाटील आंदोलनकर्त्यांना कितीही घसा कोरडा करून शांतीच्या मार्गाने लढा चालू ठेवा म्हणत असले तरी अंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे. जरांगे पाटलांच्या जीवाचे जर कांही बरे वाईट झाले तर परिस्थिती आणखिनच गंभीर होऊ शकते. तेंव्हा केंद्र व महाराष्ट्र शासनाने क्षणाचाहि विलंब न लावता समन्वयाने, इतर समाज बांधवांच्या आरक्षणाला कसलीही बाधा न येऊ देता, घटणात्मकरित्या “सरसकट मराठाङ्खङ्ख समाजाला न्याय तथा आरक्षण द्यावे. केंद्र शासनानेही या बाबतीत राज्य शासनास विशेष अधिवेशन घेण्यास भाग पाडून, मध्यस्ती करावी. घटणेच्या चौकटित बसऊन हा तिडा तात्काळ कायम स्वरूपी वेळीच मिटवावा, अशी मागणी डॉ.हंसराज वैद्य यांनी शासन दरबारी केली आहे.

 

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!