नांदेड। भारतीय जनता पार्टीचे नांदेड मनपाचे माजी गटनेते व नगरसेवक, जनसेवक अभिषेक भाऊ सौदे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन केले जाते आहे.
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते यांच्या विनंतीला मान देऊन अभिषेक सौदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली. यासाठी खा. प्रताप पाटील चिखलीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्षांनी नियुक्तीपत्र दिले आहेत.
अभिषेक सौदे यांनी अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिव पदावर राहून पक्ष संघटन वाढवले आहे. त्यामुळे यांना पदोन्नती देण्यात यावी यासाठी दिलीप कंदकुर्ते यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर महानगर कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडी नंतर सर्व स्तरातील नागरिक व भाजप पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.