महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नायगावच्या वतीने दिवाळीत फटाके मुक्त मार्गदर्शन संपन्न
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। तालुक्यातील जि.प. कन्या प्रशाळेत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा नायगाव तर्फे आयोजित नवरात्र महोत्सव व फटाके मुक्त दिवाळी या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी – विद्यार्थिनीना मार्गदर्शन करतांना, विद्यार्थिनींनी मोबालद्वारे अंधश्रध्दा न पसरविता त्याचा वापर श्रध्दा जोपासावी असे मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा नायगाव तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमांचे मुख्याध्यापक श्री आनंद रेनगुंठवार हे होते.सूत्रसंचलन प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री व्यंकट गाजुलवाड यांनी केले.
अंनिसचे प्रधान सचिव भाऊराव मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची स्थापना, उद्देश व कार्य यासंबंधी संस्थापक अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांच्या विषयी माहिती सांगितली तर कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांनी ग्रामीण भागातील जनतेला अंधश्रद्धा व श्रध्दा काय याची माहिती विद्यार्थिनींना दिली पाहिजे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री आनंद रेनगुंठवार यांनी शालेय परिपाठात अंधश्रध्दा दररोज मार्गदर्शन केले जाते व आमच्या शाळा डिजिटल शाळा म्हणून जिल्ह्यात प्रसिध्द आहे.
आजच्या तांत्रिक युगात विद्यार्थिनींना मोबाईलचा वापर आधुनिक माहिती आत्मसात करण्यासाठी केला जातो, यामुळे आमच्या शाळेतील इस्रोच्या अभियानात कु. आयशा शेख या ९व्या वर्गात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींने भाग घेतला होता तिला सौ लता सावंत मॅडम, सौ. सुनिता देशमुख मॅडम तसेच शिक्षकवृंदांनी मार्गदर्शन केले होते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील १ली ते १० वीच्या सुमारे ३०० विद्यार्थिनीं, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. शेवटी श्री शंकर पतंगे सरांच्या आभार प्रदर्नानंतर कार्यक्रम संपन्न झाला.