हिमायतनगर। तालुक्यातील सरसम गावालगत असलेल्या ऊसाच्या शेतात शॉटसर्किट होवुन आग लागली या आगीत शेतकऱ्याचे चार लाख रूपयाचे नुकसान झाल्याने विज वितरण कंपनी विरूध्द तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांचे कडे तक्रार देवुन नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
सरसम बु येथिल शेतकरी अनंतराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, माझा मुलगा नामे जगदीश अनंतराव देशमुख यांचे मालकीचे सरसम सज्जातील शेत सर्वे नंबर ७३/१ मधील ऊसाला दि. १७ मंगळवारी दुपारी १ :०० वाजताचे दरम्यान , ऊसाचे शेतातील एल.एन. के. व्ही. च्या विद्युत खांबावर आवाज होऊन शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली, त्यामुळे तीन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत चार लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार तहसिलदार आदित्य शेंडे, पोलिस निरीक्षक बिरप्पा भुसनुर, विजवितरण कंपनीकडे करण्यात आली असुन जळीत ऊस शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळुन देण्याची मागणी केली आहे.
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न
ऊसाला आग लागल्याचे लक्षात येताच, शेत गावातील वस्तीला लागुन असल्याने काही अनुचीत प्रकार घडु नये याची खबरदारी घेत वेळीच हिमायतनगर नगरपंचायतचे अग्नीशमन दलाचे वाहन बोलावण्यात आले होते. परंतु हवेच्या दाबामुळे शर्तीचे प्रयत्न करूनही, फार काही ऊस आगी पासुन वाचवता आला नाही, हवेमुळे आगीची तीव्रता जास्त होती. अग्नीशमन वाहनावर चालक शे. मुख्तार , सतिष आडे, शे फिरदोस यांनी १० हजार लिटर पाण्याचा फवारा करून कर्तव्य बजावले.