नवीन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकबाकी मालमत्ता धारकाकडे करापोटी एका दुकान जप्त करण्यासाठी गेलेल्या पथकाला तात्काळ रक्कम भरणा केल्यामुळे जप्ती कार्यवाही टळली.
मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या आदेशानुसार उपयुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,यांच्या अधिनस्त पथक असलेल्या कर निरीक्षक दिपक पाटील, सुधीर बैस,वसुली लिपीक प्रकाश दर्शने, नथुराम चवरे यांनी १४ आक्टोबर रोजी मालमत्ता करापोटी पिन क्रमांक ४०५११०८५१६ यांच्या कडे थकीत मालमत्ता ७५,५६० रूपये येणे बाकी होती, परंतु ती न भरल्याने संबधित मालमत्ता धारकाची दुकान जप्त करण्यासाठी कार्यवाही करत असतांना संबधिताने नगदी ६०४७४ रूपये नगदी भरल्याने जप्ती कार्यवाही टळली असुन थकीत मालमत्ता धारकांनी ३१ आक्टोबर पर्यंत ५०/ टक्के शास्ती योजना लाभ घेऊन मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.